ताज्याघडामोडी

किरीट सोमय्यांचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता

महाविकास आघाडी सरकारवर आरोपांचा धुरळा उडवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आता जबर धक्का बसला आहे. सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नील सोमय्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, तिथे दिलासा मिळाला नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली. पण न्यायाधीशांनी जामीन अर्ज मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला.

पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आरोप होता.

सदर प्रकरणी नील सोमय्या यांना आपली अटक होऊ शकते म्हणून सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण नील सोमय्याच्या अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे अटकेची शक्यता वाढली आहे.

संजय राऊतांचे नेमके आरोप काय?

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. “ईडीवाले सुनो. सीबीआयवाले सुनो. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे.

मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं. आणि त्याला लुबाडलं. आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. 100 कोटी घेतले. लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या. 400 कोटी रुपयांची जमीन फक्त 4.4 कोटी रुपयांनी केली. अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सोमय्या.

निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, याची ताबडतोब चौकशी करुन निल सोमय्याला अटक करा”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *