ताज्याघडामोडी

संभाजीराजे यांनी उपोषण सोडलं, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, सरकारकडून मागण्या मान्य!

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे मागील तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते.

आज अखेरीस राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्या आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी लहान मुलाच्या हाताने ज्युस पिऊन उपोषण सोडले आहे. संभाजीराजे आपल्यासाठी उपोषण करून लढा दिला हे पाहून उपस्थितीत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषणाला बसले होते. आज शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली. त्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

त्यानंतर आझाद मैदानात ज्या ज्या मागण्या मान्य केल्यात त्याची माहिती दिली आणि संभाजीराजेंना उपोषण सोडण्यास विनंती केली. त्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.

मी खुश आहे. पहिल्यांदा मी सर्व मराठा संघटना यांचे आभार मानतो. आपण केवळ महाराष्ट्र पुरते मर्यादित नाही देशभर आपण संदेश देऊ. मराठा आरक्षणाचा विषय मी मांडला आणि इतर खासदारांनी त्या नंतर तो मांडला. मराठा आणि बहुजन समाजाचे आभार मानतो. उपोषणाचा निर्णय मी कोणाला ही न सांगता घेतला.

उपोषण करणार असे वडिलांनाही सांगितले नाही, त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांना हे सांगितले पण आंदोलनाच्या दिवशी सकाळी मी त्यांना सांगितले. आई दरोरोज फोन करून लिंबू शरबत घ्या असे सांगत होत्या, असं सांगताना संभाजीराजे भावूक झाले.

शाहू महाराज हे केवळ कोल्हापूर पुरते नाही आहेत. अनेक लोकांनी टीका केली मी खासदार झाल्यावर. पण मी समाजासाठी सगळं केलं. मराठा समाजाचा विषय संसदेमध्ये कोणी नाही मांडला, केवळ मी मांडला, असं म्हणत संभाजीराजेंनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *