ताज्याघडामोडी

बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे.

दुपारी 1 च्या पुढे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं दिली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना पुन्हा वाढल्याने यंदा दाहावी आणि बारावीच्या परीक्षाचं काय होणार याबबत संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांचं लसीकरण करत शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक होताना दिसून आले.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलनही केलं. मात्र शासनाने आपाला निर्णय बदलला नाही. परीक्षा ऑफलाईनच होणार हे स्पष्ट केलं, त्यानंतर आता हॉलतिकीट बाबत माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा चालू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढा, कोरोनामुळे काही काळ शाळा बंद असल्याने अभ्यासक्रम मागे राहिला आहे, त्यासाठी तातडीने पााऊलं उचला अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहे. त्यामुळे आता शाळा शनिवार, रविवारही सुरू राहण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

ऑनलाईन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला पण प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाईनमध्ये येत नाही हे मान्य केले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *