

वाळू व्यवसायिक टिपर मालकाकडून वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी मंथली हप्ता देण्याची मागणी औरंगाबाद शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेला पोलीस निरीक्षक जनार्धन साळूंखे हा आरोपी करीत असल्याची तक्रार सदर टिपर धारकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांच्याकडे केली होती.पडताळणी वेळी सदर पोलीस निरीक्षक जनार्धन साळूंखे याने लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले होते.
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने एका ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिस पोलीस निरीक्षक जनार्धन साळूंखे याला लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले आहे.