ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजीनियरिंग मध्ये ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागातर्फे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यासाठी पुणे आळंदी येथील एमआयटी कॉलेजच्या प्राध्यापिका मिसेस सायली एस .बिडवई यांनी ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट या विषयावर मार्गदर्शन केले.

वेबिनार चे उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस पी पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक एस .एम .शिंदे यांनी करून दिली. प्रास्ताविक मेकॅनिकल विभागाचे प्रमुख आर जे पांचाळ यांनी केले.

बिडवई मॅडम यांनी याविषयी बोलताना पेटंट संदर्भात सविस्तर माहिती दिली. ‘ इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’ म्हणजे क्रिएशन ऑफ माईंड हे त्यांनी सांगितले. तसेच पेटंट फाईल करण्या मध्ये कोणते देश पुढे आहेत हे सांगत असताना आपण सुद्धा पेटंट फाईल करावे हेही त्यांनी सांगितले. त्यांनी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये कॉपीराईट व ट्रेड मार्क संदर्भात उदाहरणे देऊन माहिती दिली तसेच त्यांनी साध्या गोष्टी मध्ये सुद्धा पेटंट कसे मिळवतात व पेटंट मिळालेल्या व्यक्तींची उदाहरणे दिली.

त्यांनी इंडियन पेटंट लॉ वरही प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी समाधानकारक पणे दिली. कार्यशाळेविषयीविषयी बोलताना प्राचार्य डॉ. एस पी पाटील सर यांनी या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पेटंटची जाणीव निश्चितच होईल असे सांगितले. कार्यशाळेचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले गेले.

या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आभार कॉलेजचे प्राध्यापक व्ही एल जगताप यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेकॅनिकलचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी प्रतिक जोशी यांने केले.या कार्यक्रमाला रजिस्टर श्री गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा. जगदीश मुंडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी यांनी या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *