गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महावितरणातील अभियंत्यासह एकाला 18 हजारांची लाच घेताना अटक

अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता असलेला प्रतिक ढवळे व शिवणी रसुलापुरमध्ये राहणार्‍या प्रशांत नरोडे यांना 18 हजारांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा लावून फुबगाव फाटयाजवळ अटक केली.

तक्रारदारांनी शिवणी रसुलापुरमध्ये असलेल्या शेतीकरिता नदीतून पाणी घेण्याकरिता लावलेल्या पंपाकरिता विद्युत जोडणीचा अर्ज केला होता.विद्युत जोडणीसाठी कनिष्ठ अभियंता प्रतिक ढवळेने 15 हजाराची लाच तक्रारकर्त्याकडे मागितली. ही लाच प्रशांत नरोडे यांच्या मार्फत स्विकारण्यात येईल असेही त्याने सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने याबाबतची तक्रार एसीबीला दिली.

प्रकरणाची चौकशी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी फुबगाव फाटयावर सापळा रचून 18 हजाराची लाच स्विकारतांना कनिष्ठ अभियंता प्रतिक ढवले व लाच स्विकारणाऱ्या प्रशांत नरोडेला ताब्यात घेतले. ही कारवाई एन्टी करप्शनचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक अरुण सावंत, पोलीस उपअधिक्षक संजय महाजन यांच्या मार्गदशनाखाली पोलीस कर्मचारी सुनील वर्‍हाडे, अभय वाघ, चंद्रकांत जनबंधू, प्रदीप बारबुध्दने यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *