ताज्याघडामोडी

६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी केंद्राची महत्त्वाची सूचना, प्रिकॉशन डोस घेण्यासाठी प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक नाही

देशात येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. तर १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोस दिला जाणार आहे.

पण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रिकॉनश डोसबाबत स्पष्ट आणली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरांचे सर्टीफिकेट किंवा इतर कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक नाही, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

६० वर्षांवरील आणि गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना करोनावरील लसीचा प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोस घेताना डॉक्टरांचे कुठलेही सर्टिफिकेट देण्याची किंवा सादर करण्याची आवश्यकता नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

पण ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यानंतर करोनावरील लसीचा प्रिकॉशन डोस घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना मात्र आरोग्य मंत्रालयाने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीच्या दृष्टीने केंद्र सरकारने ही सूचना वजा सल्ला दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १५ ते १८ वर्षांदरम्यानच्या मुलांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लसीकरणासाठी मुलांना ऑनलाइनही अपॉइंटमेंट घेता येईल किंवा केंद्रावर जाऊनही लस घेता येईल. पण लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध असल्यावरच डोस मिळू शकेल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि हृदयाचे गंभीर आजार असणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस म्हणजे करोनावरील लसीचा तिसरा डोस दिला जाईल, असं सरकारने अलिकडेच जाहीर केलं आहे. पण करोनावरील लसीचा हा तिसरा डोस घेण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर ३९ आठवडे पूर्ण झालेले आणि हे ९ महिने असावे, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *