ताज्याघडामोडी

टेंडर झाले,वर्क ऑर्डर निघाली तरीही ठेकेदार काम करेना,बांधकाम विभाग दखल घेईना  

ओझेवाडी हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. या रस्त्यावरती रोज एक तर अपघात होत आहेत. या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असून हा रस्ता अपघांतांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच काम सुरू न झाल्यास शुक्रवारी दि.26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता गोपाळपूर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सदरच्या रस्त्यावरून नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यामुळे अनेकांना नाहकपणे अपघातास सामोरे जावे लागत आहे. यामुळे सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी स्वत: देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांचे पत्र घेवून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकजी चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून आणलेला आहे. त्यानंतर या रस्त्याचे कामाचे टेंडर होवून वर्क ऑर्डरही झाली आहे. मात्र सहा महिने झाले तरी अद्यापपर्यंत ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे त्या ठेकेदारावर कारवाई करावी व रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

सरकारने निधी दिला मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम सुरू झाले नाही
पंढरपूर – ओझेवाडी रस्त्याच्या कामासाठी नितीन नागणे यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकजी चव्हाण यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी दिला. टेंडर निघाले वर्कऑर्डर देण्यात आली . राज्य सरकारने निधी देवून आपली जबाबदारी पार पाडली पण ठेकेदाराच्या हलगर्जीपणा दाखल्याविल्यामुळे अजूनही रस्त्याच्या कामाला मुहुर्त लागला नसल्याची प्रतिक्रिया नितीन नागणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *