ताज्याघडामोडी

सिईओ दिलीप स्वामींची चार किमी पायी चालत चंद्रभागा परिक्रमा 

पंढरपूर – सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी पायी चालत चार किमी अंतराची चंद्रभागा परिक्रमा केली. कधी पायी चालत तर काही आंतर बोटीने प्रवास करीत त्यांनी गुरसाळे गावातील पाणी चंद्रभागा नदीत जिथे जिथे सांडपाणी मिसळते त्या भागाची पाहणी केली. 

चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्याची सर्वांची जबाबदारी- सिईओ स्वामी 

“नमामी चंद्रभागा” मध्ये ग्रामस्थांचा सहभाग हवा. चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. 

पंढरपूर तालुक्यांतील गुरसाळे येथे आज नमामी चॅद्रभागा अंतर्गत चंद्रभागा नदीच्या तिरावरील गुरसाळे गावास सिईओ दिलीप स्वामी यांनी भेट देली. या प्रसंगी ते बोलत होते. 

या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हरगर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उप अभियंता पांडव, उप अभियंता कांबळे, माजी सभापती राजेंद्र पाटील, गुरसाळे चे सरपंच संगीता कोळेकर, गोपाळपूर चे सरपंच विलास मस्के , शंकर कवडे , दीपक शिंदे, प्रमुख उपस्थित होते. 

गोपाळपूर व गुरसाळे साठी निधी देणार – सिईओ स्वामी 

सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत गोपाळपूर व गुरसाळे ग्रामपंचायती साठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत निधी उपलब्ध करून देणेत येणार आहे. या ग्रामपंचायती सांडपाणी प्रक्रिया केली जाणार आहे. गावातील गावरान जमीन या प्रकल्पा साठी उपलब्ध करून देणेत येणार आहे. ग्रामपंचायतींनी रितसर प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविणेचे सुचना केल्या. 

चंद्रभागेचे महत्व पुरातन काळा पासून आहे. चंद्रभागेचे पाणी तिर्थ म्हणून घेतात. चंद्रभागा प्रदूषित होणार नाही याची सर्वानी काळजी घेतली पाहिजे. गावातील कचरा व घाण पाणी नदीत जाणार नाही याची काळजी ग्रामस्थांनी घेतली पाहिजे. किमान १ कोटी रूपयांचा निधी गोपाळपूर व गुरसाळे या ग्रामपंचायतींना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापना साठी देणेत येणार आहे. 

चंद्रभागा स्वच्छ ठेवा-स्मिता पाटील 

जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर.. जेंव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा ..! चंद्रभागेचे महत्व पुरातन काळा पासून आहे. हे सर्व लक्षात घेऊन चंद्रभागा स्वच्छ ठेवा. जनावरे नंदू पात्रात धुवू नका. कपडे धुवू नका. पाणी स्वच्छ राहिल याची काळजी घ्या. सांडपाण्या साठी शौषखड्डे घ्या. सांडपाण्यावर प्रक्रिया करणेत येणार आहे. यासाठी लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

प्लास्टिक मुक्त गुरसाळे करा – सचिन जाधव 

नदीच्या पात्रात मैला, घाण पाणी, प्लास्टीक, कचरा, जाणार नाही याची काळजी घ्या. सर्व कुटूंबांनी शौचालयाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. सुत्रसंचालन सुधाकर कवडे यांनी केले. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी अल्पावधीत या भेटीचे चांगले नियोजन केल्यामुळे लोकांचा चांगला सहभाग दिसून आला. हात उंचावून लोकांना या अभियानात सहभागी होऊन पाठिंबा दिला. 

सिईओ दिलीप स्वामींची चार किमी पायी चालत चंद्रभागा परिक्रमा 

जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी पायी चालत चार किमी अंतराची चंद्रभागा परिक्रमा केली. कधी पायी चालत तर काही आंतर बोटीने प्रवास करीत त्यांनी गुरसाळे गावातील पाणी चंद्रभागा नदीत जिथे जिथे मिसळते त्या भागाची पाहणी केली. 

सिईओ गुरसाळे गावात आलेनंतर त्यांनी नदीकडे जाणारा रस्ता विचारला.त्यानंतर पायी चालणे सुरूवात केली. त्यांचे समवेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हे देखील पायी चालू लागले. गावातील लोक देखील या मध्ये सामिल झाले. पायी चालत त्यांनी नदीत मिसळणारे सांडपाणी व त्यामुळे होणारे नदीचे प्रदूषण ग्रामस्थांचे लक्षात आणून दिले. ते पाहून ग्रामस्थांचे देखील डोळे उघडले. पाण्यात धुतली जाणारी जनावरे , कपडे धुणारी मंडळी, हे सर्व ग्रामस्थांनी दाखवले.

सिईओ दिलीप स्वामी यांनी चार किमी अंतराची चंद्रभागा परिक्रमा पुर्ण केलेनंतर चंद्रभागा नदीला मिळणारी उप नदी कोकनदीतून बोटीने प्रवास करीत उप नदीचे द्वारे होणारे प्रदुषण व त्या द्वारे करावयाचे उपाय योजनांची पाहणी केली. त्यानंतर गुरसाळे येथे शाळेची पाहणी करून शिक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामस्थांशी एकत्रीत संवाद साधत त्यांनी नमामी चंद्रभागा या अभियानात सहभागी होऊन चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवणेचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *