ताज्याघडामोडी

युवराज परिवार ५ हजार कुटुंबासमवेत साजरी करणार दिवाळी – चेअरमन सासवडकर 

पंढरपुर प्रतिनिधी:-एकीकडे कोरोनासारख्या महामारीने प्रत्येकजन कोलमडला आहे . आर्थिक चणचण जाणवत आहे . कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे . अशातच आपला सर्वात मोठा भारतीय सन तोंडावर येऊन ठेपला आहे . मात्र पंढरपूरच्या अर्थकारणात गेल्या दिड वर्षापासुन अर्थक्रांती घडविणारी पतसंस्था म्हणुन ज्यांची ओळख झाली आशी एक संस्था म्हणजे युवराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या . पंढरपूर हि आहे .

 यंदाचा दिवाळी सन युवराज परिवार तब्बल पाच हजार कुटुंबासमवेत साजरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे . यासंदर्भात बोलताना चेअरमन उमेश सासवडकर यांनी अधिक माहिती अशी दिली की “आपले सर्व सभासद , कर्मचारी , खातेदार , ठेवीदार , कर्जदार ,पिग्मी धारक , सेव्हिंग धारक व युवराज परिवाराशी निगडीत असणा-या आशा एकुन पाच हजार कुटुंबांना दिवाळी सनाचे औचित्य साधुन प्रती कुटुंब पणती , वाती , सुगंधी वासाचे तेल , सुगंधी नैसर्गिक उठणे व रांगोळी रंग आशा एकुन पाच वस्तु घरपोहच भेट म्हणुन दिल्या जाणार आहेत . साधारणपणेप्रती कुटुंब ७५ रुपयेचे हे साहित्य असणार आहे . एकुण ३ लाख ७५ हजार रुपयांचा हा खर्च संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे .

हा एक सामाजिक उपक्रम हाती घेण्यामागे एक वेगळा विचार व प्रामाणिक भुमिका आहे.आपण आज पाहतोयच राजकीय वलय प्रस्थापित करत असताना नेते व पुढारी लाखोरुपये निवडणुकीवर खर्च करतात.पण,युवराज परिवार ह्या सगळयांना बगल देऊन पुढे जात आहे.युवराज परिवाराचा आलेख उंचावतो आहे.कारण,युवराज परिवार हा सदैव सामान्यातील सामान्य घटकांना सोबत घेऊन चालणारा परिवार आहे.

आगामी काळात युवराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातुन असेच वेळोवेळी विधायक व समाज उपयोगी उपक्रम व अर्थपुरवठा केला जाणार आहे.जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याची भुमिका व लोकांची आर्थिक सबलता प्रस्थापित करणे हा प्रामाणिक हेतु युवराज परिवाराने बाळगलेला आहे.”

एकीकडे पतसंस्था मोडकळीस येत आहेत.संस्थांवरील विश्वास हर्तता कमी होत आहे.लोकांचा कल मोठमोठया बैंकांकडे वळत आहे.तर दुसरीकडे युवराज नागरी सहकारी पतसंस्था मात्र एक वेगळा हेतु व विचार घेऊन लोकांपर्यंत पोहचत आहे.हि गोष्ट निश्चितच सामाजिक भान जपुन कांम करणा-या नव्या नांदिचा उदय आहे,असं म्हणने वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *