Uncategorized

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा आणि थिएटर सुरू करण्यात आले आहे. पण, अद्यापही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण, ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, त्याचा मोठा परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *