घरगुती 30 टक्के व व्यापाराची 70 टक्कें साखरेच्या व टेंडर मधील रु.31 वरुन रु.35 दराच्या प्रस्तावाची मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेवून प्रत्येक्त राज्यातील साखर आयुक्ता कडून प्रस्ताव मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त मा.शेखर गायकवाड यांनीही कमिटी नेमून भारत सरकार यांचेकडे वरील मागणीची व्यवस्था होणेकामी सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकार यांचेकडे सादर केला.
आज सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या वार्षिक ऑनलाईन सभेमध्ये मा.पंतप्रधान कार्यालय, मा.मुख्यमंत्री कार्यालय, साखर आयुक्त कार्यालय व देशातील आजी माजी लोकप्रतिनिधींचा वरील विषय कृतित आणणेसाठी आभार व्यक्त केले.