ताज्याघडामोडी

राष्ट्रीय लोकअदालतीत 361 प्रकरणे निकाली 07 कोटी 45 लाख रुपयांवर तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीत 361 प्रकरणे निकाली

07 कोटी 45 लाख रुपयांवर तडजोड

                पंढरपूर दि. (27):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 361 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये, एकूण 07 कोटी 45 लाख 59 हजार 601 रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती  जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी दिली.

     या लोकअदालतीमध्ये प्रलंबीत 2719  प्रकरणे आणि दाखल पुर्व 2310 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 361 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या  लोकअदालतीसाठी एकूण पाच पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनल मध्ये  न्यायाधिश एस.एच.इनामदार, न्यायाधिश एस.एस.खरोसे, न्यायाधिश ए.पी.कराड, न्यायाधिश एम.आर.कामत तर पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधिश एम.बी लंबे यांनी काम पाहिले.

         या अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात, कौटुंबीक वादाची न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच बँका , वित्तीय संस्था यांची दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.

       यावेळी  विधिज्ञ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष भगवान मुळे, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *