ताज्याघडामोडी

हरवलेल्या मुलाची वाट पहात वडिलांची आत्महत्या, 17 वर्षांपासून सुरू होता शोध

पोटचा गोळा हरवल्याचे दु:ख आई-वडिलांशिवाय कोणाला कळणार नाही. अपत्य सापडले तर ठिक अन्यथा आयुष्यभर ही वेदना घेऊनच जगावे लागते. याच वेदनेतून एका 52 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे.

त्यांचा सात वर्षीय मुलगा 17 वर्षांपूर्वी हरवला होता. पोलीस, क्राईम ब्रान्च आणि सीबीआयने शोध घेऊनही मुलाचा शोध न लागल्याने हताश झालेल्या वडिलांनी अखेर मृत्यूला कवटाळले.

केरळच्या अलपुझा येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारा राहुल राजू नावाचा 7 वर्षांचा मुलगा 17 वर्षांपूर्वी 2005 मध्ये गायब झाला होता. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला राहुल पुन्हा घरी परतलाच नाही. कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो कुठेही आढळून आला नाही. अखेर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले. राहुल बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली.

पोलिसांनीही त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. यानंतर क्राईम ब्रान्च आणि सीबीआयच्या पथकानेही राहुल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही यश आले नाही. पोटच्या मुलाचा शोध लागत नसल्याचे पाहून राहुलचे वडील ए.आर. राजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *