ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत अधिक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याच्या संभाजी शिंदे यांच्या मागणीस यश 

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट असलेल्या भाळवणी,शेंडगेवाडी,केसकरवाडी,धोंडेवाडी,जैनवाडी,सुपली,पळशी,तिसंगी,सोनके,गार्डी,लोणारवाडी,उपरी,चिंचणी,पिराचीकुरोली,वाडेकुरोली,शेळवे,भंडीशेगाव आदी गावात कोरोना रुग्णांची वाढती लक्षात घेता मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.त्याची दखल घेत शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर या भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येणार असल्याची संभाजी शिंदे यांनी दिली आहे.   

 या पूर्वीही वारंवार करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर गतसप्ताहात भाळवणी जिल्हा परिषद गटातील विविध गावासाठी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आली होती.तरी या परिसरातील विविध गावातील नागिरकांनी या लसीकरणाचा लाभ घयावा असे आवाहन संभाजी शिंदे यांनी केले आहे.   हि लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ.रेपाळ यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी हे सज्ज असून विविध गावचे सरपंच,उपसरपंच,विविध ग्रामपंचात सदस्य,शिक्षक आदींनी या लसीकरण मोहिमेस यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे.   

या बाबत अधिक माहिती देताना संभाजी शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली महराष्ट्रात मोठ्या लसीकरण मोहीम यशस्वी रित्या राबविली जात आपले गाव करुणा मुक्त गाव ही संकल्पना यशस्वीपणे राबवत असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लस उपलब्धता व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगत भाळवणी गटातील नागरिकांचे पूर्ण लसीकरण करण्यासाठी सातत्याने शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *