शहाजी साळूंखे यांना सामाजिक पुरस्कार प्रदान..,
पंढरपूर (प्रतिनिधी) दि.08- बेळगांव येथील नॅशनल रुरल डेव्हल्पमेंट फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा अंतरराज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे यांना बेळगांव जिल्हयातील चिक्कोडी येथे सन्मापुर्वक प्रदान करण्यात आला.
चिक्कोडी येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांचे शुभहस्ते व माजी खासदार अमरसिंह पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघन्नावर, ब्रिगेडीअर सुधीर सावंत,उद्योगपती सुरेश पाटील, अरविंद घटटी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खेडभाळवणी ता.पंढरपूर येथील शहाजी साळूंखे सध्या पंढरपूर येथील यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. गेली 15 वर्षाहून आधिक काळ त्यांनी आषाढी यात्रा कालावधीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयामध्ये टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर मार्गावर मोफत पाणी पुरवठा केला आहे. तर यात्रा कालावधीमध्ये भाविकांना अन्नदान करण्यामध्येही त्यांचा मोठा वाटा असतो. पतसंस्थेच्यावतीनेही मोठया प्रमाणातही सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
फोटो ओळ :
पुरस्कार वितरण प्रसंगी त्यांचे समवेत पतसंस्थेचे संचालक हणमंत दांडगे, रमेश पाटील, व्यवस्थापक सुनिल देसाई, बंडु पवार उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्या बद्दल सहकार शिरेामणीचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी साळूंखे यांचे अभिनंदन केले आहे.
