पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री शहरात घडली आहे. कौटुंबिक वादातून किरकोळ कारणाने पतीने पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, यात पतीची देखील प्रकृती देखील चिंताजनक असून त्यास शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
किरणबाई मोरे वय ४० असे मृत पत्नीचे नाव आहे, तर पतीकडून होत असलेल्या त्रासासंदर्भात एक दिवस आधी पत्नी किरणबाई मोरे यांनी त्रास देणाऱ्या पती विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी साक्री पोलीस स्टेशन येथे गेल्या होत्या, मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल साक्री पोलिसांनी घेतली नसल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर करण्यात येत आहे.
साक्री पोलिसांनी वेळेवर संबंधित महिलेच्या तक्रारीची दखल घेतली असती, तर आज ही वेळ मृत महिलेवर ओढवली नसती असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला असून महिलेच्या मृत्यूस साक्री पोलीस जबाबदार असल्याचा देखील आरोप यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आला असून, या धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण साक्री शहर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.