पत्नीच्या पोटात चाकू सोडून पतीने पलायन केल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने बेरोजगार पतीने चाकूने वार करत पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. आईने आरडाओरडा करताच आरोपी पतीने पत्नीच्या पोटात चाकू तसाच टाकून फरार झाला. महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी पतीला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव स्नेहा मेश्राम (३७) आहे. तर आरोपी पतीचे नाव मनीष मेश्राम असं आहे. स्नेहाने २०११ मध्ये आरोपी मनीषसोबत लग्न केले होते. स्नेहा पॅथॉलॉजी लॅबमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करते. तर तिचा नवरा हा बेरोजगार आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मनीष वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आहेत. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणही होत होती. रविवारी सायंकाळीही पत्नी आणि पतीमध्ये भांडण झाले. या भांडणात मनीषने भाजी कापण्याच्या चाकूने स्नेहाच्या पोटात वार करून स्नेहाला गंभीर जखमी केले.
आरडाओरडा ऐकून त्याची आई आणि शेजारची मुलगी तिथे पोहोचली. आई आणि शेजारची मुलगी आल्याचे पाहून मनीष स्नेहाच्या पोटात चाकू तसाच ठेवत तेथून फरार झाला. त्यावेळी स्नेहाच्या पोटात चाकू अडकला होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी स्नेहाच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने स्नेहाला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्नेहाची बहीण पायल उके हिने अंजनी पोलिसात मनीष विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मनीषला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.