

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील दिनेश पोपटराव गोडसे यांची निवड करण्यात आली आहे.शरद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्याहस्ते दिनेश गोडसे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी अण्णा हजारे,उमेश घोलप,मनोज पवार आदी उपस्थित होते.
शरद प्रतिष्ठानचे सोलापूर सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून स्व.गणेश गोडसे यांनी केलेले कार्य अतुलनीय होते तर आपल्या लोकसंग्रह आणि सेवाभावी वृत्तीमुळे स्व.गणेश गोडसे हे नाव कायम स्मरणात राहणार असल्याचे सांगत संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांनी यावेळी स्व.गणेश गोडसे यांच्या स्मृतीस उजाळा दिला.नूतन सोलापूर जिल्हाध्यक्ष दिनेश गोडसे हे स्व.गणेश गोडसे यांचे कनिष्ठ बंधू आहेत.ते नक्कीच शरद प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यात शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वाटचालीस आणखी बळ मिळणार असून स्व.गणेश गोडसे यांनी केलेले कार्य स्मरणात ठेवत दिनेश गोडसे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यामुळे पंढरपूर शहर,तालुक्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.