ताज्याघडामोडी

आरुषच्या उपचारासाठी शहीद वीर भगतसिंग सामाजिक संघटनेचा मदतीचा हात

पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरामध्ये राहणाऱ्या आरुष सुरवसे या पाच वर्षांच्या मुलास ब्लड कॅन्सर या दुर्धर व्याधीने गाठले आहे. त्याच्या उपचारांसाठी अनिल नगर मधील शहीद वीर भगतसिंग सामाजिक संघटनेने सामाजिक भान जपत त्याच्या कुटुंबियांच्या हातात ५१,५५१₹ चा चेक सुपूर्द केला.

गेल्या महिन्यापासून आरुषवर मिरज येथील श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या केमोथेरपी व इतर उपचारांचा खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून होत असला तरी प्रत्येक आठवड्याला रक्त आणि प्लेटलेट्स यासाठीचा खर्च मात्र व्याजाने काढलेल्या पैशांतून चालू आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सदरचा खर्च झेपण्याच्या पलीकडील असल्याने संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत ठाकरे व कार्यकर्त्यांनी समाजाला आवाहन करत निधी संकलन केले. अनिल नगर येथील विघ्नहर्ता गणेश मंदिरात काल दि.१२ ऑगस्ट रोजी जमलेल्या निधीचा चेक आरुष व त्याच्या कुटुंबियांच्या हातात देण्यात आला. 

याप्रसंगी ह.भ.प. श्री रामकृष्ण वीर महाराज, श्री तुकाराम खंदाडे सर, श्री मंगेश परिचारक सर, डॉ.अमोल केसकर, श्री सोमनाथ जाधव, श्रीमती शुभांगीताई भुईटे, डॉ.प्रशांत ठाकरे सर, अमृत गायकवाड, संतोष दिवेकर, श्रीकांत गंगेकर, अमित गायकवाड, आकाश गायकवाड, रोहित माने, अभिजित शिंदे, शिवम जाधव, माऊली बैताडे मिस्त्री, बापू वाघमारे, सिद्धेश्वर शिंदे, अंजुताई शिंदे, आरती सुरवसे इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *