ताज्याघडामोडी

भाळवणी गटात शिवसंपर्क अभियान प्रचंड प्रतिसाद

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेच्या हितासाठी करीत असलेले कार्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी घेत असलेले विविध निर्णय यांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या असलेल्या समस्या जाणून घेवून त्या समस्या शासन दरबारी पोहोचविण्याचे काम या शिवसंपर्क अभियनाच्या माध्यमातून करणार असल्याचे मत शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी व्यक्त केले.
भाळवणी (तालुका : पंढरपूर) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियना अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले धान्य पात्र शिधापत्रिका धारकांना मिळण्याबाबत तक्रारीचे निराकरण करणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यातील अडचणी जाणून घेणे याचबरोबर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे व त्याबाबत अडचणी दूर करणे, लसीकरणा विषयी माहिती जाणून घेणे हा या शिव संपर्क अभियानाचा हेतू असल्याचे सांगितले. तर “गाव तिथे शाखा आणि घर किती शिवसैनिक” हे आपले ध्येय असल्याचे सांगितले यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे संघटनेचा विस्तार वाढण्यास मदत होईल त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महावीर देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे, उपतालुका प्रमुख प्रवीण शिंदे, विभाग प्रमुख महेश इंगोले, शाखाप्रमुख पोपट इंगोले, ग्रामपंचायत सदस्य रणजीत जाधव, विजय लिंगे, संजय मोहिते, दत्तात्रय लिंगे, जयसिंग पवार, मनोज कलढोणे, अजित राऊत, सचिन शेरकर, महादेव पवार, भैया पटेल आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *