ताज्याघडामोडी

पंढरीत गुरुदेव नगर येथे शिवसंपर्क अभियान बैठक संपन्न

शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यास १२ जुलाई पासून सुरुवात, पंढरपुर मधील गुरुदेव नगर मध्ये ही बैठक संपन्न.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास १२ जुलाई पासून सुरुवात झालेली असून शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक पंढरपूर शहरातील प्रत्येक भागात, प्रभागात जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे जनतेच्या हितासाठी करीत असलेल्या कार्य, जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी घेत असलेले विविध निर्णय आणि याबाबत जनतेचे प्रबोधन या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर भाऊ अभंगराव तसेच हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख रवींद्र मुळे यांच्या हस्ते करून करण्यात आले, यावेळी बोलताना शिवसेनेचे पंढरपुर शहर प्रमुख मा.रविंद्र मुळे यांनी या शिवसंपर्क अभियाना निमित्त शहरातील सर्व शाखाप्रमुख व शिवसैनिक त्या त्या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेत तोच प्रयत्न करतील अशी ग्वाही देत पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना सामान्य जनतेच्या पाठबळावर मोठे यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ प्रत्येक गरजुंना घेता यावा यासाठी शिवसैनिकांनी कशा प्रकारे याची माहीती प्रभागातिल नागरिकांना देवून त्यातील त्यांच्या अडचणी दूर करायला हव्यात याची माहीती दिली. 
यावेळी बोलताना स्वप्निल गावडे यांनी पंढरपुरशहरात येवू घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकित शिवसेनेचे नगरसेवक पंढरपूर नगरपरिषद मध्ये कसे जातील यावर सर्व शिवसैनिकांनी भर देऊन सर्व तळागाळातील शिवसैनिकांना बरोबर घेवुन शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख यांच्या मदतीने शिवसेनेचा नगरसेवक वार्डात निवडून आणण्याचे आश्वासन दिले. 
यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख विनय वनारे यांनीही उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश बुराडे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता विनय वनारे यांनी केली.
या शिवसंपर्क अभियान बैठकीचे आयोजन पंढरपुर शहरातील हद्दवाढ भाग, संतपेठ, गुरुदेव नगर येथे शिवसेनेचे पंढरपुर उपशहर प्रमुख विनय वनारे यांनी केले होते.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. सुधीरभाऊ अभंगराव, शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख मा. रविंद्र मुळे, शिवसेना उपशहर प्रमुख मा. लंकेश बुराडे, मा. सचिन बंदपट्टे, मा. अविनाश वाळके, मा. समाधान अधटराव, मा. बाबा अभंगराव, अपंग सेना शहर अध्यक्ष मा. शिवाजीराजे कोष्टी, शिवसेना विभागप्रमुख अरुण कांबळे, एसटी कामगार सेनेचे कोषाध्यक्ष बिट्टू चव्हाण, सचिव गणेश पवार, विभागीय उपाध्यक्ष संजय गंगणे, उपाध्यक्ष नितीन घाडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक मुकुंद नेत्र राव, शिवसेना शाखा प्रमुख प्रदीप बडवे, स्वप्निल गावडे, तसेच हां कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुदेव नगर येथील भैय्या खांबास वाडकर, ऋषिकेश वनारे, अनिकेत चंदनशिवे, सनी सादिगले, राहुल डोंगरे, पंकज पांढरे, पप्पू गायकवाड, सागर हुचे, भैया वडतीले, अमर थोरात, बंडू डोईफोडे, मुरलीधर खांबास वाडकर, नितीन ढोबळे, शेखर लालबोंद्रे, ओम जय हरी, बबलू थोरात, सागर यादव, जय चव्हाण व इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *