ताज्याघडामोडी

लाचखोर पोलीस निरीक्षक पवार व स.पो.नि.खंडागळे निलंबित

सलगर वस्ती ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत पवार आणि सहायक निरीक्षक रोहन खंडागळे या दोघांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. पोलिस आयुक्त यांनी हे आदेश दिले आहेत. या दोघांवर शनिवारी साडेसात लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली होती.
निरीक्षक पवार आणि खंडागळे यांना शनिवारी न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक कविता मुसळे तपास करत आहेत. न्यायालयात सरकारतर्फे दत्तूसिंग पवार, पोलिसतर्फे नीलेश जोशी या वकिलांनी काम पाहिले. लाच कारवाई शुक्रवारी झाली.

तक्रारदार ठेकेदाराकडे डोणगाव परिसरात चार किमीचा मुरुम भरण्याचे कॉन्ट्रॅक्ट होते. एका शेतातील मुरुम चोरून नेल्याबाबत ठेकेदारविरुध्द तक्रार होती. ठेकेदाराचे जप्त केलेले डंपर सोडवणे तसेच त्यांना अटक न करता, तपासात मदत करण्यासाठी दहा लाखांची लाच मागितली होती. साडेसात लाख देण्याचे ठरलेे. जुना पूूना नाका येथे सापळा रचला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *