ताज्याघडामोडी

पत्रकारीतेतून समाजासाठी योगदान दिल्याबध्दल महेश खिस्ते सन्मानित

कोरोनाच्या संकटकाळात  समाजाला उपयोगी पडणारे काम केले व कायमच आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिल्याबध्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दैनिक तरुण भारत सोलापूरचे उपसंपादक व पंढरपूरातील जेष्ठ पत्रकार महेश खिस्ते यांचा विशेष गोरव करण्यात आला.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य व दिमाखदार सोहळ्यात सन्मान देवदूतांचा या शिर्षकाखाली माान्यवरांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी सांगलीचे राजे विजयसिंह पटवर्धन,दै.पुढारीचे मुंबई आवृत्ती प्रमुख विवेक गिरीधारी,आयबीएन लोकमत न्युज चॅनेलचे प्रमुखbआशुतोष पाटील,संकल्प प्रतिष्ठानचे डॉ.एन पी कदम कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक किरण जोशी,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज़ अनिल पाटील, हे मान्यवर उपस्थित होते.  

 कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत काम केलेल्या  व कायमच समाजासाठी झटणार्‍या विशेष कार्य केलेल्या महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यातील नामांकित मान्यवरांचा समावेश या पुरस्कारात केला होता. या कार्यक्रमात पत्रकारीतेतून समाजासाठॅ योगदान देणार्‍या महाराष्ट्रातील प्रमुख पत्रकारांचा विशेष गौरव करण्यात आला.

गेली 30 वर्षापासून राज्यातील विविध मान्यवर दैनिकातून लेखन करणार्‍या व सध्या दै.तरुण भारत सोलापूरचे उपसंपादक म्हणून कार्यरत असणारे महेश खिस्ते यांचा केंद्रीय समाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले,माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस,आरोग्यमंत्री डघॅ.राजेश टोपे व मान्यवरांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत समाजासाठी झटणार्‍या व्यक्तीच्या सत्कारा बाबत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *