ताज्याघडामोडी

लस घेतल्यास ऍडमिट व्हायची शक्यता होते 80 टक्क्यांनी कमी

नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलंय की, स्टडीमधून असं समजलंय की, लस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची शक्यता जवळपास 75 ते 80 टक्क्यांनी कमी होते. पुढे त्यांनी म्हटलंय की, अशा व्यक्तींना ऑक्सिजनची गरज भासण्याची शक्यता देखील 8 टक्क्यांनी कमी होते. तर लसीकरण झालेल्या व्यक्तीवर आयसीयूमध्ये भरती व्हायची जोखिम देखील फक्त 6 टक्केच राहते.

डॉ. पॉल यांनी असं देखील म्हटलंय की, कोरोना व्हेरियंट येत राहतील आणि ते वाढत राहतील.त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या आपल्या फॉर्म्यूल्यामध्ये कसलाही बदल येणार नाहीये. नवा व्हेरियंट यायच्या आधीच आपल्याला त्यापासून वाचण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. डॉ. वीके पॉल यांनी लोकांना आवाहन करत म्हटलंय की, लस हजारो लोकांचं आयुष्य वाचवत आहे त्यामुळे जरुर लस घ्या.

एम्स आणि WHO च्या लहान मुलांवरील सर्वेक्षणात आढळलंय की, सीरो पॉझिटीव्हीटी मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांमध्ये देखील आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की, तयारीच्या पातळीवर कसलीही कमतरता राहणार नाही. लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स 21 जूनपासून लागू होतील.

सीरो पॉझिटीव्हीटी म्हणजे काय?

सीरो पॉझिटीव्हीटीचा तपास करण्यासाठी रक्तातून सीरमला वेगळं केलं जातं. त्यानंतर या सीरममधील इतर घटकांची तसेच सूक्ष्म तत्वांची प्रत्येक स्तरावर तपासणी केली जाते. जर या सीरममध्ये एँटीबॉडीज आढळल्या, ज्या व्हायरसशी लढण्यास सक्षम असतात तर यालाच सीरो इम्यूनिटी अथवा सीरो पॉझिटीव्हीटी असं म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *