वाफगाव किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सकारात्मक भुमीका- शरद पवार

महापराक्रमी यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या वाफगाव किल्ल्यास आज राष्ट्रवादी कॉगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली असून या भेटीबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देत नेपोलियन सारख्या पराक्रमी योध्याचा पराभव करणाऱ्या लॉर्ड वेलस्लीचा पराभव भारतात राजे यशवंतराव होळकरांनी केला त्यांचे जन्मस्थान हे एक पराक्रमाचे प्रेरणास्थान आहे. या गढीचे संवर्धन करण्यासाठीच गावाला भेट दिली असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले असून या किल्ल्याचे सर्वधन करण्यात यावे यासाठी पुन्हा एकदा एक ऐतिहासिक वास्तू तिथे उभी राहावी या हेतूने या वाड्यात शासनाने पुन्हा लक्ष घालावे आणि शाळेसाठी गावात इतरत्र जागा उपलब्ध करून येथे रयत शिक्षण संस्थेची शाळा उभारावी ही सहकार्याची भुमीका असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
रयत शिक्षण संस्थेला पर्यायी जागा देता येईल का, ती कोणती असावी याची समस्त गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार हे वाफगाव येथे आले होते. सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली असून इथे स्मारक होण्यास कोणतीही अडचण नाही. याउलट हे स्मारक प्रेरणास्थळ राहीलच परंतु या भागाचा विकास घडविण्यासाठी या स्मारकाचा मोठा वाटा राहील. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील. इतर संलग्न गोष्टी विकसित होतील.अशी माहिती त्यांनी दिली आहे.