ताज्याघडामोडी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाले 6 व्हेंटीलेटर

पंढरपूर (प्रतिनिधी) : युवासेना सोलापूर जिल्हा, पंढरपूर विभागाचे  जिल्हा युवाधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी केलेल्या मागणीनुसार युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यासाठी 6 व्हेंटिलेटर बायपॅप मशिन्स मिळाल्या आहेत. या मशिन्स मिळवण्यासाठी युवासेना कोअर कमिटी सदस्य रुपेशजी कदम व युवासेना राज्य विस्तरक विपुल पिंगळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दोन व्हेंटिलेटर बायपॅप मशिनचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम,  पंचायत समिती सहा. गट विकास अधिकारी,  जेष्ठ शिवसैनिक साईनाथभाऊ अभंगराव, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे,  युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे, पंढरपूर शहर प्रमुख रवी मुळे,  युवासेना पंढरपूर शहर प्रमुख महावीर अभंगराव यांचेसह युवासेना जिल्हा चिटणीस  दत्तात्रय गोरे, उपतालुका प्रमुख महादेव बंडगर, सांगोला युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, युवासेना सांगोला तालुका   समनवयक शंकर मेटकरी, अमित गायकवाड, किरण भांगे हे उपस्थित होते
 
सध्या कोरोनाच्या संकटकाळात व्हेंटिलेटर मशिन्सचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता. अश्या परिस्थितीत गोरगरिबांसाठी मोफत व्हेंटिलेटर सुविधा मिळावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयासाठी काही व्हेंटिलेटर बायपॅप मशिन द्यावेत अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे यांनी एप्रिल महिन्यात केली होती. या मागणीला यश आले असुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या प्रयत्नातून तातडीने 6 व्हेंटिलेटर बायपॅप मशिन सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाल्या आहेत. यापैकी   2 पंढरपूर, 2 सोलापूर महागरपालिका तर 2 मशिन माळशिरस येथील ग्रामीण  रुग्णालयासाठी उपलब्ध झाल्या आहेत. अशी माहिती युवासेनेचे पंढरपूर शहर युवा अधिकारी महावीर अभंगराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

युवा सेनेनं प्रसंगानुरूप केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *