Uncategorized

करकंब ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांनी घेतला लसीकरणाचा लाभ

करकंब/प्रतिनिधी,

ग्रामीण रुग्णालय करकंब येथे शनिवारी दिव्यांग यांच्यासाठी लसीकरण आयोजित केले होते यामध्ये जवळपास शंभर दिव्यांग व्यक्तींनी यावेळी लसीकरणाचा लाभ घेतला.
        कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे देशामध्ये लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढला असून लसीकरणातुन कोणीही वंचीत राहू नये यासाठी प्रयत्न होत आहे या लसीकरण प्रकियेतून वय वर्षे 18 च्या पुढील दिव्यांग व्यक्ती ज्या मुखबधिर, कर्णबधिर, अंध,अपंग, मनोरुग्ण,अस्थिव्यंग, यांना पण लसीकरणाचा लाभ प्राधान्याने द्यावा असा आदेश शासनाचा असून या आदेशानुसार करकंब ग्रामीण रुग्णालयात शनिवारी लसीकरण आयोजित करण्यात आले होते यामध्ये साधारणता शंभर दिव्यांग व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतला.

 आरोग्य विभागाने दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र ज्यांना दिले आहे त्यांना या लसीकरणावेळी लस दिली गेली एक दिवस निवडून दिव्यांग व्यक्तीना लस मिळाल्यामुळे या व्यक्ती मध्ये समाधान दिसत होते लसीकरण वेळी करकंब ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.तुषार सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.वाहील,डॉ.लोंढे,सुरेश कुरणावळ, रोहन गायकवाड, साजिद ब्रदर, भातकापडे सिस्टर,आशा वर्कर मुखरे मॅडम,हिराबाई चव्हाण, अंजली कांबळे, वर्षा माळी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *