ताज्याघडामोडी

मोठी बातमी : महाराष्ट्र ७ जूनपासून अनलॉक !

महाराष्ट्रातील जनता गाढ झोपेत असतानच साखरझोपेत असतानाच राज्यामध्ये अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (५ जून) मध्यरात्रीनंतर हे नवे आदेश जारी करण्यात आले असून नवीन आदेशानुसार सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या आधारावर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशांमध्ये सर्वच गोष्टींचा उल्लेख आहे. जीम, लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल्स, सार्वजनिक वाहतूक, मैदाने, खासगी कार्यालये अशा सर्वांसंदर्भातील नियम या आदेशांमध्ये आहेत. 

५ टप्प्यांत जिल्ह्यांची वर्गवारी

पहिला टप्पा

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा टप्पा

पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा टप्पा

पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा टप्पा

पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा टप्पा

पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात अकोला,कोल्हापूर,बीड,उस्मानाबाद,पालघर,रत्नागिरी,सातारा,सांगली,सिंधुदूर्ग,सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु काय बंद?

  • तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील. तर इतर दुकाने ही केवळ सोमवार ते शुक्रवार याच दिवशी सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील.
  • दुपारी दोन वाजल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात येईल.
  • हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील. २ नंतर पार्सल सेवा सुरु राहतील.
  • खासगी व सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.
  • सामाजिक,सांस्कृतिक,मनोरंजनात्मक कार्यक्रमाला सोमवार ते शुक्रवार दुपारी २ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे.
  • सिनेमा चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. इंडोर स्पोर्टंस बंद राहतील.
  • सार्वजनिक उद्याने,मैदान,वॉकिंग सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील.
  • लग्नासाठी ५० माणसांची उपस्थिती तर अंत्यविधीसाठी २० माणसांना परवानगी देण्यात आली आहे.
  • कृषी क्षेत्रीतील कामे,ई कॉमर्स,बांधकाम क्षेत्र दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *