ताज्याघडामोडी

कोरोना अपडेट: पंढरपूर शहर तालुक्यात आज कोरोना बाधितांचे आकडेवारीचा नीचांक

5 एप्रिल पासून पंढरपूर शहर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली, एप्रिलच्या वीस तारखे नंतर धडकी भरवणारी आकडे पुढे येऊ लागले आणि ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर बेडसाठी पंढरपूर तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना अगदी सांगली इचलकरंजी कोल्हापूर उस्मानाबाद आदी ठिकाणी रुग्णास नेणे भाग पडले. कोरणा च्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट भयानक असल्याचा अनुभव पंढरपूरकर यांनी घेतला मे महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात हीच परिस्थिती कायम राहिली तिसऱ्या सप्ताहात तर उच्चांकी साडेपाचशे बाधित एकाच दिवशी आढळले. पण पंचवीस मेपासून शहर तालुक्यातील रुग्ण संकेत घट नोंदवली जाऊ लागली असून उपचार घेत असलेल्या करून आबादी त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे आज पंढरपूर शहरात नव्याने 10 कोरूना बाधित आढळले असून तालुक्यात 44 यांची नव्याने नोंद करण्यात आली आहे. मात्र उपचार घेणाऱ्या त्यांचा आकडा ही हजाराच्या आत आला असून पंढरपूर शहरातील 52 कोरोना बाधित अन्वर उपचार सुरू आहेत तर ग्रामीण भागातील 878 कोरुना बाधित सध्या उपचार घेत आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेवर असलेले करणाचे सावट हळूहळू कमी होत असल्याचेच मानावे लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *