ताज्याघडामोडी

रिक्षा चालकांना अनुदानासाठी तहसिल कार्यालयात नोंदणीची सुविधा

रिक्षा चालकांना अनुदानासाठी तहसिल कार्यालयात नोंदणीची सुविधा

 

पंढरपूर, दि. 31 :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑटोरिक्षा चालकांना शासनाकडून 1500 रुपये सानुग्रह अनुदान जाहिर करण्यात आले आहे. परवानाधारक रिक्षा चालकांना  आवश्यक माहिती ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे.  तालुक्यातील परवानाधारक ऑटोरिक्षा  चालक अनुदाना पासून वंचित राहु नये यासाठी तहसिल कार्यालय पंढरपूर येथे ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरु करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

            कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून निर्बंध जाहिर करण्यात आले असल्याने सेतू केंद्र बंद असल्याने रिक्षा चालकांची गैरसोय होवू नये यासाठी तहसिल कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. तालुक्यात सुमारे 2 हजार 500 ऑटोरिक्षा चालक परवानाधारक असून, ऑनलाईन नोंदणीसाठी आलेल्या प्रत्येक परवानाधारक रिक्षा चालकांची कोरोना चाचणी घेवूनच तहसिल कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. अनुदान नोंदणीसाठी परवानाधारक रिक्षा चालकांनी आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक, वाहन चालविण्याचा परवाना, अनुज्ञप्ती क्रमांक आवश्यक आहे.  संबधित कागदपत्राची संगणक प्रणालीवर प्रमाणित झाल्यानंतरच रिक्षा चालकांच्या खात्यात तात्काळ 1500 रुपये सानुग्रहअनुदान जमा करण्यात येणार असल्याचे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले आहे.

             तालुक्यातील परवानाधारक रिक्षा चालकांनी संगणक प्रणालीव्दारे सानुग्रह अनुदान अर्ज  नोंदणी आवश्यक कागदपत्रांसह तहसिल कार्यालय पंढरपूर येथे उपस्थित रहावे. तसेच कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क व सामाजिक अंतराचे पालन करावे , असे आवाहनही तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *