सोमवारी रात्री साडे दहा-पावणे अकरा वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीने एमजीरोडवरून जात होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने प्रहार केला. यामुळे कोकणे रक्तबंबाळ झाले. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने ते घाबरून गेले. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
