

पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी महेश दिगंबर शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बाभुळगाव शिवारात महेश शिंदे व त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीतिला सव्वा एकर ऊस पेटवून देऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे.या प्रकरणी नवनाथ भिकू वाघमारे यांच्यासह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल फिर्यादीनुसार फिर्यादी महेश शिंदे आणि नवनाथ वाघमारे यांचा काही दिवसापूर्वी शेतीचा बांध टोकरण्यावरून तसेच शेतात जनावरे सोडण्यावरून वाद झाला होता.या वादाचा राग मनात धरून सदर नवनाथ वाघमारे यांच्यासह ४ जणांनी ऊस पेटवून दिला असून आरोपी ऊस पेटवत असताना ३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचेही फिर्यादीत नमुद केले आहे.
या प्रकरणी आरोपी विरोधात भादंवि ३४,४३५,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.