ताज्याघडामोडी

आघाडीचा धर्म मोडाल तर प्रहार मधून हकालपट्टी केली जाईल ः ना. बच्चु कडू

आघाडीचा धर्म मोडाल तर प्रहार मधून हकालपट्टी केली जाईल ः ना. बच्चु कडू
 मंगळवेढा(प्रतिनिधी)ः आघाडीचा धर्म मोडाल तर प्रहार मधून हकालपट्टी केली जाईल असा इशारा प्रहारचे संस्थापक व राज्यमंत्री ना. बच्चु कडू  यांनी प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटना प्रहार अपंग क्रांती आंदोलन या सर्व पदाधिकार्‍याची कार्यकर्त्यांची बैठक घेऊन केला.
यावेळी त्यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे पोटनिवडणुकीमध्ये कै.भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना निवडून आणण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे असे आवाहन केले.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ना.बच्चु कडू यांनी श्रीराम मंगल कार्यालय येथे बैठक आयोजित केली. आणि या बैठकीत उपस्थित सर्वांना आवाहन केले की,मी कोणता पक्ष, धर्म, जात बघून आलो नाही तर माझी बांधीलकी शेतकर्‍याची आहे आणि शेतकर्‍याची झटणारा वाघेला त्याच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी मी या ठिकाणी भगिरथ दादांना  निवडून देण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे. माझ्या बाबतीत त्यांनीही कधी कोणतीही गोष्ट न बघता आपल्या संघटनेसाठी शेतकर्‍याचे आंदोलनामध्ये सदैव व त्यांनी तत्परता दाखवली. आणि यासाठीच आपल्याला त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथाच्या पालक यांना निवडून द्यायचे आहे. पण जनतेत मिळून-मिसळून राहणारा नेता गेल्याने मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ पोरका झाला आहे. तर या मतदारसंघाला भगीरथ दादाच विकासाची गंगा दाखवू शकतात. असे ठणकावून सांगितले. कुणी दादागिरीची भाषा दाखवाल तर आमची  प्रहार स्टाईलने त्याचे उत्तर देऊ असे बच्च कडू यांनी ठणकावून सांगितले . बच्चु कडू यांनी सांगितले की प्रहार चा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता इतर कोणत्याही स्टेजवर दिसता कामा नये. नाहीतर आम्ही आल्यावर जवळ जवळ आणि आम्ही गेल्यावर बोळातून कमळाचा प्रचार करणार अशी अजिबात चालणार नाही. अशा पदाधिकार्‍यांचे पदके काढून घेतली जातील. तसे दिसल्यास पक्षातून काढून टाकू. अशा स्वरूपाची तंबी देऊन भगीरथ भालके यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागा असा आदेश दिला.
 यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी, भगीरथ भालके यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना अपंग क्रांती संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते . त्याचबरोबरप्रहार अपंग क्रांती चे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत, अजित भाऊ कुलकर्णी, शहराध्यक्ष. प्रहार अपंग क्रांती जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, प्रहार संघटनेचे युवा जिल्हाअध्यक्ष प्रा. संतोष पवार, अपंग क्रांती जिल्हा सचिव संजय जगताप, राजकुमार स्वामी, यांनीही आपल्या भाषणामध्ये भगीरथ भालके यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
 यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष व शेकडो प्रहार सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *