ताज्याघडामोडी

अजित पवार यांच वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – समाधान आवताडे

अजित पवार यांच वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – समाधान आवताडे
मंगळवेढा-    आज उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या दामाजी कारखान्यावर बोलतात, मोगलाई लागून गेली का म्हणतात, अडचणीत असतानाही संत दामाजी साखर कारखाना आम्ही सलग पाच वर्षे चालवला, दुष्काळ परिस्थितीचा सामना केला पण कारखाना बंद होऊ दिला नाही, मी उलट अजित पवारांना विचारतो तुमच्या आजूबाजूला प्रचारात जी नेते मंडळी आहेत त्यांच्या कारखान्यांची काय अवस्था झाली ते तपासून पहा, तुमचं आमच्यावर टीका करणं  म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणावं लागेल.
आवताडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, विरोधक आज 35 गावांना पाणी आणले, भोसे प्रादेशिक पाणी सर्वांना मुबलक पाणी आणले, औद्योगिक क्रांती केली अशा घोषणा करत आहेत, किती भूलथापा?किती फसवं राजकारण, मी माझ्या कर्तृत्वावर इथपर्यंत आलोय, मी केलेल्या कामाच्या मुद्द्यावर तुम्हाला मत मागतोय, परिचारक कुटुंब जीवाचं रान करत आहेत, याचा विचार करा, आपलं बहुमोल मत कमळाला द्या.

   पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक येथील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांची मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी, जालिहाळ, सिद्धनकीरे, भोसे, ले.चिंचाळे याभागात सभा झाल्या यावेळी माजी मंत्री अनिल बोडें, रयत क्रांतीचे  दिपक भोसले, प्रा येताळा भगत, दामाजी कारखान्याचे व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी, संचालक राजेंद्र सुरवसे, सचिन शिवशरण, बसवेश्वर पाटील, माजी सभापती प्रदीप खांडेकर, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष माऊली कोंडूभैरी, त्या त्या गावचे सरपंच, चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *