ताज्याघडामोडी

बारामती-इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी 5 हजार कोटींची तरतूद तर मग मंगळवेढ्याच्या 35 गावांना तरतूद का नाही?-आ.प्रशांत परिचारक 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यंदा 35 गावच्या पाणी प्रश्न पुन्हा प्रचाराचा मुद्दा झाला आहे, भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ निंबोणी या गावी विराट सभा झाली, आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले, परिचारक कुटुंबावर कायम आरोप होत आलाय, त्यामुळे आम्ही ठरवले यंदा माघार घ्यायची,  तुमच्या हक्काच्या माणसाला संधी द्यायची, दोघांच्या मत विभाजनात तिसऱ्याला फायदा का?  67 टक्के मार्क पडलेला उमेदवार नापास झाला, 33 टक्के मार्क मिळालेला माणूस पास झाला त्यामुळे तुमच्या समोर सुवर्ण संधी चालून आली आहे, त्या संधीचे सोने करायचे का माती तुम्ही ठरवा.
आ. परिचारक पुढे बोलताना, मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षे गाजतोय, त्याची चर्चा होती ठोस निर्णय होत नाही, राज्याच्या बजेटमध्ये बारामती-इंदापूर च्या सिंचन योजनेसाठी 5 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तिथे एवढया तरतुदीची गरज आहे का? मंगळवेढयाच्या 35 गावांना पाणी देण्यासाठी निधी नव्हता का? 2014 गेलं आता 2024 आलं, आता म्हणे सर्व्हे चालू आहे, पाईपलाईन मधून आता शेतीला पाणी देणार किती दिवस जनतेची फसवणूक करणार हे लोक?, आता वेळ आहे पाच राज्याच्या निवडणुकी सोबत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक होतेय यांना धडा शिकवा समाधान आवताडे यांना विजयी करा असे आवाहन केले.
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.या सभेत उपस्थित ग्रामस्थांना भाजपचे माजी राज्यमंत्री तथा जिल्हा निरीक्षक बाळासाहेब भेगडे यांनी संबोधित केले. भेगडे म्हणाले, राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी  आणि कॉंग्रेसचे सरकार महाविकासचे सरकार नसून महावसुली सरकार आहे, ती शेतकरी, कामगार, वंचित, आदिवासी, धनगर समाजाला सोडत नाही,महिलांवरील अत्याचार थांबवू शकत नाही, देशात सध्या 5 राज्यात निवडणुका आहेत मात्र संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीकडे. राज्यातील जनता वाट पाहत आहे, या महावसुली आघाडीच्या सरकारचा कडेलोट होणार याची सुरुवात या निवडणुकीत जनता करणार आहे. भेगडे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते मात्र एकही शेतकऱ्याची वीज कट केली नाही, मात्र अधिवेशन संपताच शेतकऱ्यांच्या वीज कट करण्यात आल्या, केंद्रातील मोदी सरकारने गरिबांना घरे दिली, शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार देत आहेत, 60 वर्षापुढील शेतकऱ्यांना पेन्शन देत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सोबत रहायचे की 12 वर्ष फसवलेल्या पक्षासोबत राहायचे तुम्ही ठरवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *