ताज्याघडामोडी

काशीकापडी समाजाला न्याय कधी मिळणार ? सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांचा शासनाला खडा सवाल!

काशीकापडी समाजाला न्याय कधी मिळणार ?
सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांचा शासनाला खडा सवाल!

पंढरपूर (प्रतिनिधी):- कित्येक वर्षापासुन आपल्या न्याय्य हक्कापासुन वंचीत राहिलेल्या काशीकापडी समाजाला शासनाकडून न्याय कधी मिळणार असा खडा सवाल काशीकापडी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते ़श्रीनिवास उपळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे विचारला आहे.

निवडणुका येतात आणि जातात, निवडणुक काळात आमच्या समाजाला राजकीय नेत्यांनी दिलेली आश्‍वासनं मात्र निवडणुकीनंतर हवेतच विरुन जातात. पुन्हा निवडणुका आल्या की राजकीय नेत्यांचे पाय आमच्या समाजाच्या उंबर्‍याला लागतात. केवळ मताचा गठ्ठा म्हणून आमच्या समाजाला पाहिले जाते का? हा आमच्या समाजावरील अन्याय आता आम्ही सहन करणार नाही. आणि समाजातील प्रत्येक मतदार केवळ आश्‍वासनं देऊन पुन्हा विसरुन गेलेल्या नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असे स्पष्ट मत श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केलं आहे.

वारकरी सांप्रदायात अतिशय महत्वाचं आणि पवित्र प्रतिक समजल्याजाणार्‍या तुळशीच्या माळा बनविण्याचं ऐतिहासिक काम काशीकापडी समाज पिढ्यानपिढ्या करत आलेला आहे. परंतु अद्यापही आमच्या समाजाला श्रीविठ्ठल मंदिर परिसरात तुळशीमाळा विक्रीसाठी जागा मिळालेली नाही. तसेच आमच्या समाजातील महिला भगिणींचा जुने कपडे विकण्याचा व्यवसाय आहे यासाठी भोसले चौक येथे जागा मिळावी ही मागणीही प्रलंबित आहे. अद्याप आमच्या समाजमंदिरालाही शासनाने जागा दिलेली नाही. भटक्या जाती जमाती प्रवर्गामध्ये मोडणारा हा काशीकापडी समाज असुनही आमच्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही सवलत अथवा सुविधा मिळत नाही. समाजाला जातीचे दाखले सहजासहजी मिळत नाहीत. सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा काळ आहे. आमच्या समाजाची पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात एकुण 4500 एवढी निर्णायक मते आहेत.  आमच्या या मागण्यांचा विचार करुन आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने ठोस पर्याय घेवूनच राजकीय नेत्यांनी आमच्या समाजाकडून मतदानाची अपेक्षा करावी. अशी स्पष्ट भुमिका श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *