गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून वाळूचा ट्रॅक्टर पळविला,गुन्हा दाखल

कर्जत येथील महसूल विभागाच्या पथकाने घुमरी येथील सीना नदीच्यापात्रात अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडले.मात्र या कारवाईत तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला. याबाबत अधिक माहिती अशी कि,अवैध वाळू उपसा कारवाई केलेले दोन्ही ट्रॅक्टर कर्जत येथे आणत असताना ट्रॅक्टर चालक सचिन अनभुले याने आपल्या मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीला फोन करून बोलावून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘मी आत्महत्या करत आहे’, असा मित्राला मेसेज पाठवून पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने घेतला गळफास

औरंगाबाद : जीवलग मित्राला मध्यरात्री, मी आत्म्हत्या करत आहे, मित्राकडे 18 हजार रुपये आहेत, त्याच्याकडून घेऊन ते वडिलांना देऊन टाक, असा मेसेज करुन एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी क्रांतीचौक पोलिस कॉलनीत हा प्रकार समोर आला. किरण शेषराव मोरे, 24 असे त्याचे नाव आहे. सिल्लोड ग्रामिणला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चारित्र्यावर संशयावरून पत्नीची हत्या,पतीनेही केली आत्महत्या

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केला आहे. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. उषा योगेश गायकवाड (वय 28) आणि योगेश तानाजी गायकवाड (वय 33) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा आणि योगेश यांचा 13 वर्षांपूर्वी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विवाहित प्रियकराने अपहरण करून काढला प्रेयसीचा काटा; धक्कादायक कारण आलं समोर

एका विवाहित प्रियकराने आपल्या प्रेयसीचं अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रियकराने हत्या केल्यानंतर प्रेयसीचा मृतदेह एका कालव्यात फेकून दिला होता. मृत तरुणी घरातून गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्ह्याची तपासणी करत असताना, पोलिसांनी हत्येच गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याने आपल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या महिलेला नवरा अन् मुलीकडून मारहाण; चाकूनं जीवघेणा हल्ला

छिंदवाडात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनावर मात करून घरी परतलेल्या महिलेला तिच्या पती आणि मुलीनं मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोनाशी दोन हात करून १७ दिवसांनी घरी परतलेल्या महिलेचा पती आणि मुलीशी वाद झाला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. छिंदवाडातील हॉटेल जे. पी. इनच्या मागील परिसरात राहणाऱ्या शोभना पटौरिया […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

“मामापासून वाचवा, आमच्या जीवाला धोका”; प्रेमविवाह केल्यानंतर BJP आमदाराच्या भाचीचा व्हिडीओ व्हायरल

कौशांबी – काही वर्षापूर्वी बरेली येथील भाजपा आमदाराची मुलगी साक्षी मिश्राने घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केले होते. ज्यावरून खूप मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून असंच एक प्रकरण समोर येत आहे. कौशांबीचे भाजपा आमदार लाल बहादूर यांची भाची लग्नाच्या एक दिवसाआधीच घरातून पळून गेली. त्यानंतर तिने तिच्या प्रियकरासोबत लग्न […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागणारा शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख गजाआड

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देऊरवाडा ते आर्वी या हायवेचे काम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरु आहे. या कामावरील सुपरवायझरकडे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख याने खंडणीची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांनी निलेश देशमुख याला आज (सोमवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास अटक केली. कंपनीच्या रास्ता बांधकामावर काम करीत असलेले सुपरवायझर अनिकेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आंतरजातीय विवाह केल्याच्या राग, बापाचा मुलगी-जावयावर चाकूहल्ला

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील चिकणी गावात सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका बापाने मुलीवर आणि जावयावर हल्ला केला. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच वर्षांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरोधात विवाह ‘प्रेम म्हणजे प्रेम असते,तुमचं आमचं सेम असते’, मात्र ही संकल्पना समाजातील सर्वच घटकाला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बारामतीत जि. प. सदस्याच्या पतीवर गोळीबार

पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना तालुक्यातील माळेगाव येथील संभाजीनगर येथे सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. रविराज तावरे यांच्यावर बारामती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात इसमांनी गोळीबार केला असून याबाबत तपास सुरू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सासूसोबत जोरदार भांडण, रागाच्या भरात सात महिन्याच्या बाळाला जबर मारहाण

नागपूर : असं म्हणतात की आई ही आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करते. तिच्या मायेला सीमा नसल्याचे सांगितले जाते. मात्र, नागपुरात एक विचित्र प्रकार घडला आहे. आपल्या सात महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एका आईने रागाच्या भरात जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांचा थरकाप उडालाय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नागपूर पोलिसांनीसुद्धा या प्रकाराची गंभीर दखल […]