गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नुपूर शर्माला मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाकडे सापडला 11 इंच लांब चाकू आणि नकाशा, राजस्थान सीमेवर अटक

प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा न्यायालयात धाव घेत आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यात असलेल्या हिंदू मलकोट सीमेवर बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला यापूर्वी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. त्याला कटाच्या अंतर्गत भारतात पाठवण्यात आले आहे. बीएसएफच्या चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासे झाले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जावयाचा सासऱ्याच्या घरावर डल्ला, घरफोडी करुन लंपास केले साडेसहा लाख

सासऱ्याच्या घरातच घरफोडी करुन चोरी करण्याचा प्रकार जावायाने केला आहे. पुण्यात हडपसरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी त्या जावायाला बेड्या ठोकल्या आहेत. 10जुलै 2022 ला विश्वजीत अशोक कांबळे यांच्या घरामध्ये दुपारी घरफोडी झाली होती. कांबळे यांच्या घरची मंडळी दुपारी चित्रपट पाहायला गेल्यानंतर त्यांच्या घरी घरपोडी झाली होती. घरात घरफोडी करताना कोणतीही तोडफोड झाली दिसली नाही. यामुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

स्कूलबस चालकानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर चक्क स्कुलबसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडल्याने संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. गेले अनेक वर्ष ती या बसमधून शाळेचा प्रवास करत होती. स्कूलबस चालक आणि पीडित मुलगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यासोबत रोज शाळेत जावं लागत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चारित्र्याच्या संशयावरुन आधी पत्नीची हत्या, दोन दिवसांनी भावालाही संपवलं अन् नंतर..

उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकीमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून मृतदेह लपवून ठेवला होता. त्यानंतर मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या करून त्याने स्वतःवर गोळी झाडली. इतकेच नाही तर मधल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांवरही बँकेने हल्ला करून जखमी केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – शुकुलपूर गावात राहणारे राज नारायण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सासूचा केला खून, सुनेला अटक

सासूने मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सूनेने चक्क सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना चाकण येथे घडली आहे. सासूने घरात स्वयंपाक बनवला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळालं नाही. या कारणावरून सासू आणि सुनेत वाद झाला. याच वादातून सुनेने सासूचा खून केला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सुनेला अटक केली आहे. सुषमा अशोक मुळे (वय-71 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वेटरने बिल मागितलं म्हणून केले त्याचे अपहरण; धक्कादायक घटना

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वेटरने बिल मागितलं, म्हणून त्याला बेदम मारहाण करून त्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. योगेश सर्जेरावर पारधे (वय २८ अहमदनगर), रवींद्र सखाहरी कानडे (वय ४१), रुपेश अशोक वाडेकर (वय ३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, अंगणात थुंकल्याने केला मोठ्या भावाचा खून

क्रोध आल्याने माणसाच्या हातून काहीही होऊ शकते. रागाच्या भरात अनेकदा माणून आपली सद्बुद्धी गमावतो आणि मग होत्याचं नव्हतं घडतं. अशीच एक भयंकर घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेड शहरातील शिवराय नगर येथील धक्कादायक बाब म्हणजे रक्ताच्या नात्यानेच एका तरुणाचं आयुष्य संपवलं आहे. नांदेडमध्ये अंगणात थुंकल्याच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्घुण हत्या केली आहे. या घटनेने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य विभागा कडील मुकादम उत्तम ढवळे यांना अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य विभागाकडील मुकादम श्री उत्तम शंकर ढवळे हे आषाढी यात्रा कालावधीमध्ये लोकमान्य विद्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी घेत असताना तीन व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आल्या महिला सफाई कर्मचारी असताना त्या ठिकाणी एका बाजूला लघवी करण्यासाठी उभारले यावेळी महिला सफाई कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्याने मुकादम यांनी त्यांना हटकले असता त्यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरीत आलेल्या भाविकांचे बोलेरो चारचाकी लंपास दगडी पुलानजीक दर्शनासाठी गेल्यानंतर घडला प्रकार 

पंढरीची आषाढी वारी  म्हणजे भाविक भक्तांसाठी जणू आनंदाची पर्वणीच असते.आषाढ शुद्ध प्रतिपदेपासूनच शहरात भाविकांची वर्दळ वाढली असतानाच चोरटयांनी देखील आपली करामत दाखविण्यास सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागेल.    जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भाविक रामकिसन कीडवे हे दिनांक २ जुलै रोजी सहकुटूंब विठ्ठल दर्शनासाठी पंढपुरात आले.१२ वाजनेच्या सुमारास त्यांनी चंद्रभागा तीरावरील दगडी पुलानजीक असलेल्या मोकळ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सांगलीत नऊ जणांनी केली नव्हती सामूहिक आत्महत्या.., तांत्रिक अब्बासने चहा दिला आणि एक एक करून झाला सर्वांचा मृत्यू

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली नसून तांत्रिक अब्बास मोहम्मद अली याने ही घटना घडवून आणली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिकाने कुटुंबातील सदस्यांना आळीपाळीने चहा दिला आणि सर्व नऊ जण एकामागून एक मरण पावले. सांगलीत कथित सामूहिक आत्महत्येचा हा खुलासा झाल्याने खळबळ […]