गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्न दुसरीकडे ठरवलं म्हणून प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार; स्वत:लाही संपवलं !

एकतर्फी प्रेमप्रकरणामध्ये मुलीने आपल्याला नाकारत दुसऱ्या मुलाशी लग्न का ठरवले या रागातून ऐका माथेफिरु प्रियकराने चक्क प्रेम करणाऱ्या मुलीवरती गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा विक्की आणि पीडीत मुलगी हे दोघे एकमेकांचे नातेवाईक होते. मुलाचं पीडीत मुलीवरती प्रेम होतं मात्र यांच लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरल्यामुळे विक्की नाराज होता आणि या नाराजीतूनच त्यांनी हे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेयसीने मानसिक त्रास देऊन ५ लाखाला लुबाडले

प्रियकर पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याचा राग येऊन प्रेयसीने ऐन दिवाळीत आपल्याच हाताने विष पाजल्याची घटना जालन्यात घडली आहे. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या प्रियकराने शुद्धीवर आल्यानंतर या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी पोलिसांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीची हत्या, स्वतःचाही कापला गळा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करून पतीने स्वतःचा गळा कापून घेतल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने याच विषयावरून झालेल्या वादानंतर तिची हत्या केली. पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. असा वाढला संशय बिहारच्या जमुई भागात राहणाऱ्या छोटेलाल सोरेन यांचं संगीता […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एकाच घरामध्ये पुरुषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ

पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर  येथील कुंभारवाडा  येथे एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला असून मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शरद भुजबळ (47) आणि हेमा (43 – ही नेपाळी महिला आहे) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. शरद भुजबळ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आ.गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

सांगलीच्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गट आमने-सामने आले आहेत. यावेळी पडळकर यांची गाडी फोडली आहे. तर त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या आहेत. काहीजण जखमी झाले आहेत. आटपाडी मधील साठे चौकात ही घटना घडली आहे. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत.सांगली येथे जिल्हा मध्यवर्ती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या महिलेची 36 वार करून हत्या

आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संत कबीरनगर येथे ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उघडकीस आला. या महिलेच्या अंगावर ३६ वार करण्यात आले असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत कबीरनगर येथे राहणाऱ्या पूजा आंबेकर (२७) या संदीप आंबेकर नामक व्यक्तीसोबत वास्तव्यास होत्या. मध्यरात्री […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ओढ्यात आढळले तीन मुलींचे मृतदेह; कुटुंबीयांना आहे ‘हा’ संशय

मिरज तालुक्यातील टाकळी येथे जुना मालगाव रस्ता परिसरातील मळलेवाडी ओढ्यात एक तरुणी, एक १६ वर्षीय मुलगी आणि एका बालिकेचा मृतदेह आढळला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नंदिनी देवा काळे (वय १६), मेघा चव्हाण काळे (वय १८) आणि स्वप्नाली टवळ्या पवार (वय ६, सर्व रा. पारधी वस्ती, आंबेडकर नगर, टाकळी) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांचाही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! दिवाळीली माहेरी न पाठवल्याने पत्नीची आत्महत्या, धक्क्याने पतीनेही संपवले जीवन

दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी आपल्याला सोडून गेल्याने हादरून गेलेल्या पतीने देखील दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडलीय. दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्यावर मोठा हल्ला, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत आज एक विचित्र आणि जिवघेणा प्रकार घडला आहे. हा अभिनेता आणि त्याची संपू्र्ण टीम  जेव्हा बंगळूर विमानतळावर पोहोचले, तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालं नसलं, तरी इतका कडेकोट बंदोबस्त असताना देखील असा हल्ला केल्याने लोकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दीड हजार किलो बनावट खवा जप्त

पावडरपासून भेसळयुक्त खवा तयार करणाऱ्या तीन कंपन्यावर छापा टाकून अन्न व औषध विभागाने कोल्हापूरात दीड हजार किलो बनावट खवा जप्त केला. वीस लाखाचा हा माल जप्त करतानाच तीनही कंपन्यांचे व्यवसाय परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईने जिल्ह्यात भेसळयुक्त खवा तयार करण्याचे प्रमाण फार मोठे असल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात खवा तयार […]