गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रिक्षाचालकावर ब्लेडने वार करुन तिघा प्रवाशांनी लुबाडले

प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी रिक्षाचालकाला धमकावून त्याच्यावर ब्लेडने वार करुन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या तिघांपैकी कुमार राम कांबळे (वय २१, रा.आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याला अटक केली आहे. याबाबत रिक्षाचालक अजयकुमार मुन्नालाल सरोज (वय २५, रा. कात्रज) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १५८/२२) दिली आहे. ही घटना मार्केटयार्डमधील बैलबाजारात गुरुवारी रात्री दहा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यावरून वाद, अल्पवयीन मुलीने केली तरुणाची हत्या

सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आपले फॉलोअर्स वाढवण्याच्या वादावरून एका अल्पवयीन मुलीने एका तरुणाची हत्या केली आहे. या घटनेत तरुणीसह तिचा भाऊ आणि दोन मित्रही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तिच्यासह तिच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. त्यातील एक साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. मृत तरुणाचं नाव साहिल असं असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

उच्चशिक्षित तरुणीला लाखोंचा गंडा ; सायबर गुन्हेगारांकडून उच्चशिक्षित लोकं टार्गेट

पुण्यात एका तरुणीला सायबर गुन्हेगाराकडून तब्बल 1 लाख 13 हजारांना गंडा घातला आहे. यावरून नागपूरच्या 23 वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, असून त्यानुसार डायना स्पेन्सर नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या दादर नगर हवेली येथे नोकरीला असून त्या पुण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अ‍ॅमेझॉनची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रियकरासाठी मोठया बहिणीने केली लहान बहिणीची हत्या

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील नगर मनमाड महामार्गालगत तीनचारी जवळील रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी वय १६ हीचा आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. उपस्थितांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. घटना घडल्यापासून मयत मुलीची मोठी बहीण ही आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. त्यामुळे संशयाची सुई तिच्याकडे जात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर अत्याचार

जळगावातील 29 वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिला बिहारमध्ये येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. 29 वर्षीय पीडीता मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लुटमार करुन वृद्धेवर बलात्कार, नंतर पोलिसांवर हल्ला

ज्येष्ठ नागरिकांचा आपण आदर करतो. ज्येष्ठ नागरीक म्हणजे समाजाला दिशा देणारे गुरुच. त्यांना आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले असतात. त्याच अनुभवाच्या आधारावर समाजात एक पिढी घडते. त्यामुळे ज्येष्ठांचा आपण नेहमी सन्मान करतो. पण औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सन्माला तडा जाईल अशी धक्कादायक आणि प्रचंड विचित्र घटना घडली आहे. एका सराईत चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हुंड्यासाठी मानसिक छळ; विवाहितेनं संपवलं जीवन

हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ व सासरच्या जाचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे ३० सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह ५ जणांना अटक केली आहे. राधिका पवन खेत्री (वय २२) असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. राधिकाला अवघी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणीचा विनयभंग करुन डिलिव्हरी बॉयचे पलायन

तरुणी एकटीच असल्याचा फायदा उचलत पनवेलमध्ये एका डिलिव्हरी बॉयने चक्क तरुणीचा विनयभंग केला. या घटनेने घाबरलेली तरुणी घरात पळाली. तरुणी घरात गेल्याची संधी साधुन तो डिलिव्हरी बॉय तेथून पसार झाला. पनवेल तालुक्यातील कोन गावाजवळ असलेल्या ‘इंडीयाबुल्स’ या उच्चभ्रू इमारतीमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सूमारास एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीने स्विगी, या अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सावत्र आईच्या मारहाणीत साडे तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

सावत्र आईने केलेल्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली येथे घडली. डोंबिवलीत घडलेल्या एका घटनेमुळे शहर हादरून गेले आहे. मारहाणीमुळे झालेल्या जखमांमुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सावत्र आईला पोलिसांनी अटक केली आहे.चिमुकल्याला मारहाण करणाऱ्या निर्दयी महिलेचं नाव अंतिमादेवी असे आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अंतिमा देवी विरोधात गुन्हा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बॉयफ्रेंड देत होता लग्नास नकार; गर्लफ्रेंडने मागवलं ऑनलाईन विष अन्…

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने अनेक वेळा अत्याचार केले. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असुन अत्याचार करणाऱ्या तरुणावर बदलापुर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र वसंत भोईर असं पीडितेवर अत्याचार करणाऱ्या प्रियकराचं नाव […]