विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी केले. शनिवार दि १९ ऑक्टोबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित केलेल्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे महाविद्यालय स्तरावरील […]
ताज्याघडामोडी
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर या संस्थेच्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला शासनाकडून कडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी बी फार्मसी व डी फार्मसी ला प्रवेश घेऊ शकतात. बी फार्मसी व डी फार्मसी ला प्रवेश घेण्यासाठी १६३४७ हा इन्स्टिटयूट कोड वापरावा […]
देशाच्या विकासासाठी भारतरत्न डॉ.कलाम यांचा आदर्श घेतला पाहिजे-निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर स्वेरीमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ साजरा
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असाल तर संशोधनामध्ये नक्की करिअर करा. ज्यांना शिकण्याचे तंत्र माहीत नाही ते शिकूच शकत नाहीत या तंत्रानुसार डॉ.अब्दुल कलाम हे सामान्य माणसाकडे देखील बारकाईने लक्ष देत असत. डॉ.कलाम म्हणायचे ‘माणूस मुळीच निवृत्त होत नसतो. जेंव्हा तुम्ही येथून […]
कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या विविध विभागातील तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीकडून उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबरच कार्पोरेट क्षेत्रामध्ये आवश्यक असणार्या सर्व मूलभूत कौशल्यांचा सखोल अभ्यास करून […]
मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला असून ६ कोटी ४५ लाख ४८ हजार ५१४ विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार आहे मंगळवेढा तालुक्यातील १००४ शेतकऱ्यांनी या फळ पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता त्या शेतकऱ्यांनी एकूण ७५२ हेक्टर क्षेत्रावर हा फळ पिक […]
चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून व विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माढा कृषी व संस्कृती महोत्सव २०२४ या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य शामियाना आणि मंडप पूजन अभिजीत पाटील यांच्या हस्ते पार पडले. […]
कुलगुरू डॉ. महानवर सरांनी थोपटली स्वेरीच्या विद्यार्थ्यांची पाठ स्वेरीत चित्र व हस्तकला प्रदर्शनाचे उदघाटन
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंजिनिअरींगच्या प्रथम वर्ष विभागाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम’अंतर्गत चित्रकलेचे व हस्तकलेचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. […]
प्रथम वर्ष बी.फार्मसी आणि एम.फार्मसी प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया सुरु दि. ७ ऑक्टोबर पर्यंत चालणार ही प्रक्रिया
पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष बी.फार्मसी आणि एम.फार्मसी प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शनिवार, दि. ५ ऑक्टोबर, २०२४ पासून ते सोमवार, दि. ७ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत म्हणजेच एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत स्वेरी फार्मसीच्या स्क्रूटिनी सेंटर (एस.सी क्रमांक ६३९७) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात […]
स्वेरी मध्ये ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा ‘मेसा’ चा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वेरीमध्ये‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्वेरी संचालित इंजिनिअरिंग व फार्मसीच्या पदवी व पदविका तसेच एमसीए व एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांना एक दिवस सुट्टी दिली. स्वेरीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. स्वेरीचे […]
कंफर्ट झोन सोडून काम केल्याशिवाय यश अशक्य – व्यवस्थापकीय संचालक डॉ. नागेंद्र कोंडेकर स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘राष्ट्रीय फार्मासिस्ट सप्ताह’ उत्साहात साजरा
पंढरपूर- ‘फार्मासिस्ट हे केवळ औषधांमध्येच तज्ञ नसतात तर ते आरोग्य सेवा प्रणालीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. त्यांचे काम केवळ औषधे देणे हे नसून रुग्णांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत राहून त्यांचे आरोग्य कसे उत्तम राहील यासाठी मार्गदर्शन करणे हे होय. यासाठी वेळोवेळी योग्य माहिती देवून त्यांना उर्जित करणे, औषधांच्या योग्य वापराबाबत जागरूक करणे, आरोग्य शिक्षण देणे हे महत्त्वाचे […]