मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात नवविवाहित पतीनं पत्नीची चाकूनं भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. इंदूरच्या धार नाका परिसरात राहणाऱ्या विक्रमचा विवाह २१ मे २०२३ रोजी अंजलीशी झाला. ज्या हातांवर विक्रमच्या नावाची मेहंदी रंगली, तेच हात अंजलीच्या रक्तांनी माखले. अंजलीची हत्या करताना आरोपीदेखील जखमी झाला. त्याच्या हाताला इजा झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. […]
ताज्याघडामोडी
भाच्याने अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेलिंगमुळे मामीने जीवन संपवलं; भाचा म्हणतो, तीच मला…
भाच्याने आधी लपून छपून आपल्याच मामीचा नको त्या अवस्थेतील व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा अश्लील व्हिडिओ दाखवून तो मामीला ब्लॅकमेल करु लागला. परंतु भाच्याच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. महिलेने रात्रीच्या वेळेस राहत्या घरातच आत्महत्या केली. बिहारमधील नालंदा येथे पहाडपुरात ही धक्कादायक घटना घडली आहे. भाच्याकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेने सोमवारी ५ जून […]
पुढील ३-४ तासात वादळी वाऱ्यासह पाऊस, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा
मान्सून जसा जसा जवळ येतोय तसा राज्यात हवामानातील बदल जाणवतो आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने नागरिकांना हैराण केले आहे. अचानक आलेल्या पावसाने लोकांची धांदल उडाली, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून (IMD) काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ४ जिल्ह्यांना […]
मुलांना ड्रममध्ये टाकलं, झाकण लावलं; चार लेकरांना संपवून आईचं टोकाचं पाऊल, संपूर्ण गाव सुन्न
एका महिलेनं तिच्या चार मुलांची हत्या करुन आत्महत्या केली आहे. चार मुलांना अन्नधान्याच्या ड्रममध्ये बंद केल्यानंतर महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली. ती गर्भवती होती. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बानियावास गावात राहणाऱ्या उर्मिलानं (२७) तिच्या चारही मुलांना धान्याच्या ड्रममध्ये बंद केलं. मुलांना ड्रममध्ये […]
माहेरहून पैसे आण…; बायकोला सासुरवाडीत बेदम मारहाण करत सतत त्रास; एके दिवशी…
सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आव्हई येथे घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोचना ज्ञानेश्वर पवार (वय ३२) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. लोचना यांचा आव्हई येथील ज्ञानेश्वर उध्दव पवार यांच्यासोबत १२ वर्षापूर्वी […]
सासुरवाडीत बायकोसोबत शेतात फेरफटका मारत होता, भरदिवसा जावयाची हत्या
पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची त्याच्याच सासुरवाडीत भरदिवसा शेतात हत्या झाली. मावळ तालुक्यातील गहुंजे परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूरज काळभोर (वय २८) असं मृत झालेल्या तरुणाचं नाव असून तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाली आहे. दीड […]
Whatsapp मेसेज आला, ‘खिशात ३ लाख, मागे गुंड लागलेत, मला मदत करा’ २ तासांनी सापडला मृतदेह
महावितरण सबस्टेशनच्या कार्यालयात कार्यरत असलेले सिनिअर ऑपरेटर यांचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यूआधी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज टाकला होता. ज्यात त्यांनी म्हटलं की, “माझ्या मागे ४ ते ५ गुंड मुलं लागले असून हे सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाहीये. माझ्या सोबत ३ लाख रूपये आहेत. मी कसा तरी स्व:ताला […]
सराफा दुकानावर फिल्मी स्टाईल दरोडा, 10 कोटींचे दागिने घेऊन दरोडेखोरांचा पोबारा
सांगलीमध्ये सराफा दुकानावर फिल्मी स्टाईलने टाकण्यात आला असून दरोडेखोरांनी जवळपास 10 कोटी रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सांगली-मिरज मार्गावरील गजबजलेल्या वस्तीमध्ये ‘रिलायन्स ज्वेल्स’ नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. ग्राहक बनून दुकानात आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले आणि दिवसाढवळ्या दुकानावर दरोडा टाकला. दरोडेखोर कोट्यवधींचे दागिने घेऊन फरार झाले आहेत. […]
नवरदेवाच्या स्वागतासाठी दार सजवलं, तिथूनच भावाची अंतयात्रा काढण्याची वेळ; लग्नाच्या काही तासापूर्वी अनर्थ घडला
ज्या दारात काही तासात लेकीच्या लग्नाचं वऱ्हाड येणार होते, त्याच दारातून भावाची अंतयात्रा निघाली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना बिहारच्या जेहानाबाद येथे घडलं आहे. लेकीच्या लग्नाचा आनंद साजरा करत असलेल्या घरावर अचानक दु:खाचा डोंगर येऊन कोसळला. एकीकडे सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक लग्नाच्या तयारीत गुंतलेले असताना अचानक गोळी चालण्याचा आवाज आला आणि परिसरात एकच कोलाहल माजला. […]
जिच्यासाठी घर सोडलं, तिनंच संपवलं; कारण ठरले फोन कॉल
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनं तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. लखीमपूर खिरीतील चमरुआ गावात १ जूनला एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसीनंच प्रियकराची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. लखीमपूर खिरीतील चमरुआ गावात दोन […]