राज्यात केतकी चितळे असो की नवनीत राणा, यासह विविध विषयावरून सद्यस्थितीत ते राजकारण सुरू आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, हे सर्व थांबले पाहिजे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. भाजपचे नेते, मनसेचे राज ठाकरे, असो की महाविकास आघाडी सर्व पक्षांमध्ये मध्यस्थी करेन, मी […]
ताज्याघडामोडी
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, मनपा निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केला होता. या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फार पाऊस पडत […]
पत्नीच्या स्वभावामुळे ५ महिन्यातच पतीने संपवलं आयुष्य, स्टेटसला शेअर केला सुसाईड व्हिडिओ
लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यातच एका २५ वर्षीय तरुणाने व्हॉट्सअप्पवर ‘आय क्विट’ असं स्टेटस ठेऊन राहत्याघारी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजनगर मुकुंदवाडी भागात ही घटना घडली आहे. घटनस्थळी पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये पसंतीची पत्नी न भेटल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. अजय समाधान साबळे वय-२५ (रा. राजनगर, मुकुंदवाडी) असं मृत तरुणाचं […]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, BMW कार आणि एसटीमध्ये धडक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. या अपघातातून आमदार संग्राम […]
नवरा-सासूसह चौघांना गुंगीचं औषध पाजलं, पाच लेकरांसह विवाहिता प्रियकरासह पळाली
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका 45 वर्षीय महिलेने जेवणात गुंगीचे औषध मिसळून सासरच्या लोकांना दिले. यानंतर ही महिला तिच्या 5 मुलांना सोबत घेऊन प्रियकरासह पळून गेली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्ध सासूसह तिघा सख्ख्या भावांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत […]
वाचन,संशोधन आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा वापर करून विद्यार्थ्यानी यश खेचून आणावे : यतीन शहा
कर्मयोगीचा कॅम्पस म्हणजे नंदनवन.“कर्माटेक 2K22” चे शानदार उद्घाटन वाचन, संशोधन आणि आत्मविश्वास या त्रीसुत्रींचा वापर करून विद्यार्थ्यानी यश खेचून आणावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी मनामद्धे न्युनगंड न बाळगता कठोर परिश्रमाच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण करावीत असे. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी बदलत्या तंत्रज्ञाना बरोबर स्वत:चे ज्ञान विकसित करावे असे प्रतिपादन प्रिसीजन कॅमशाफ्ट ली. कंपनीचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योजक श्री. […]
आमदाराच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न; दोघांना अटक
शिवसेना आमदार अजय चौधरी यांची हुबेहूब सही करून 78 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न करणाऱया दोघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. सुकेतू दवे आणि जयेश शहा अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आमदार अजय चौधरी यांचे एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. गेल्या आठवडय़ात चौधरी यांचा 78 लाख रुपयाचा चेक बँकेत क्लिअरिंगसाठी आला […]
काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केल्याने काँग्रेस चांगलीच नाराज झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उघडपणे यावर भाष्य करत राष्ट्रवादीवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. यातच काँग्रेस […]
सोलापूरकरांनो काळजी पूर्वक नक्की वाचा !
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले आवाहन सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याबाबत मांडली महत्वपूर्ण भूमिका उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासंबंधी ही आमची भूमिका आहे;आणि ती कायम राहील…!! सोलापूर जिल्हा हा अवर्षणग्रस्त जिल्हा असून जिल्ह्यातील ९७ टक्के लोक शेतीवर तर ३ टक्के लोक उद्योगावर अवलंबून आहेत . हा जिल्हा रब्बीचा जिल्हा असून बाष्पीभवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. पाणी […]
निवडणुका कधीही लागू दे, तुम्ही तयारीला लागा! शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश
महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यासाठी जिह्याजिह्यांत जाऊन तेथील पायाभूत सुविधांचा आढावा घ्या, लोकांच्या समस्या जाणून घेऊन आपल्या सरकारच्या माध्यमातून कशा सोडवता येतील यासाठी पाठपुरावा करा, शिवसंपर्क अभियानातून आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. निवडणुका कधीही लागूद्यात, आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ […]











