ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक दिव्यांग, ऐंशी वर्षावरील 15 हजार 470 मतदार टपाली मतदानासाठी  दोन मतदान केंद्रावर सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक दिव्यांग, ऐंशी वर्षावरील 15 हजार 470 मतदार टपाली मतदानासाठी  दोन मतदान केंद्रावर सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती    पंढरपूर(25):- 252- पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकसाठी  १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. कोरोनाच्या आजाराच्या संसर्गामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक, दिव्यांग तसेच कोविड बाधित रुग्णांना टपाली मतदानाची सुविधा […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाचीच – नितीन नागणे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाचीच – नितीन नागणे पंढरपूर – 2009 साली स्व.आमदार भारत भालके यांनी रिडालोस या आघाडीतून विजयी झालेल्या पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भालके यांना मुंबईला येण्यासाठी खास विमान पाठवून दिले होते. त्या दिवशी ते मुंबई येथे आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतलेले होते. 2009 ते 2019 या 10 वर्षांच्या […]

ताज्याघडामोडी

इंधन स्वस्त

मुंबई : फेब्रुवारीत तब्बल १६ वेळा झालेल्या दरवाढीनंतर पेट्रोलने काही शहरात शंभरी ओलांडली होती. जागतिक कमॉडिटी बाजारातील कच्च्या तेलातील महागाईचे कारण त्यावेळी केंद्र सरकारने दिले होते. मात्र चौफेर टीकेनंतर अखेर पेट्रोलियम कंपन्या नरमल्या आहेत. क्रूड ऑइलचा भाव कमी झाल्याचे आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे आज देशभरात […]

ताज्याघडामोडी

परिचारक पुन्हा पक्षासाठी ‘त्याग’ करण्याच्या तयारीत !

२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज दाखल  करण्यास सुरुवात झाली असून १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसकडून भगीरथ भालके हेच उमेदवार असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या आकस्मात निधनामुळे लागलेल्या या पोटनिवडणुकीत भालके सर्मथकांना स्व.आमदार भारत भालके यांनी थेट संर्पक आणि सहज उपलब्धता,जनतेच्या प्रश्नासाठी घेतलेली आक्रमक […]

ताज्याघडामोडी

५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा राज्यांना अधिकार 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत केंद्राने मराठा आरक्षणाला  थेट पाठिंबा दर्शवणारा दावा केला आहे. आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकण्यासाठी सर्वांत मोठी अडचण ठरणारी 50 टक्के  आरक्षण मर्यादाच योग्य नसल्याचा दावा मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. महाराष्ट्र राज्याने दिलेलं मराठा आरक्षण संविधानिक असल्याचं केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता […]

ताज्याघडामोडी

“मी देवेंद्र फडणवीसांच्या विचाराचा कट्टर कार्यकर्ता”

विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग झाली होती. मात्र राज्यात पक्षांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांकडे नेत्यांचा कल वाढला होता. मात्र माथाडी कामगारांचे नेते आणि शिवसेनेकडून लोकसभा लढविणारे नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. तसेच भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. माथाडी कामगारांच्या प्रश्नांनावर वेळोवेळी मागणी करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ दिला […]

ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यावर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विटरवर शेफाली वैद्या नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर करत किती खोटं बोलणार असे म्हटले होते. याच व्हिडिओवर वेदश्री नावाच्या ट्विटर वापरकर्त्या तरुणीने पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजीत जाधव आणि त्यांच्ये मित्र अजित […]

ताज्याघडामोडी

गजानन मारणे स्वत:ला रॉबीनहूड समजतो काय ?

गुंड गजा मारणे यास पौड पोलीस ठाण्याच्या मोकाच्या गुन्हयातून न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी मुक्त केले होते. तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यावर त्याने समर्थकांसह भव्य रॅली काढली होती. यामध्ये कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते, तसेच रॅलीचे व्हिडिओ व स्टेटस टाकत त्याच्या समर्थकांनी प्रसिध्दी दिली होती. गजा मारणेवर खुन, मारामारी, खंडणी आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून परस्परविरोधी […]

ताज्याघडामोडी

.. अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा

आपलं सरकार असतानाही अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा. अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा. कोणताही अन्याय सहन करू नका, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत  यांनी दिला आहे. नितीन राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.   […]

ताज्याघडामोडी

रुग्णांकडून पैसे लाटणारा डॉक्‍टर ‘एसीबी’च्या जाळ्यात

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णावरील उपचारासाठी मागितले पैसे तळेगाव दाभाडे – सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत संपूर्ण मोफत औषधोपचार केले जातात. मात्र रुग्णाच्या नातेवाईकाकडून नऊ हजार रुपयांची लाच घेताना डॉक्‍टर व खासगी व्यक्‍तीला रंगेहाथ पकडले. पवना हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (दि. 23) सायंकाळी 4 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. डॉ. […]