ताज्याघडामोडी

राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊनची शक्‍यता; काही बाबी शिथिलही केल्या जाण्याचे संकेत

मुंबई, दि. 11 – राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस आणि अन्य आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले असून, ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्‍यता असली तरी त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. […]

ताज्याघडामोडी

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण रखडणार; राजेश टोपेंनी मांडली वस्तुस्थिती

देशात लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे. महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. मात्र, लशींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) […]

ताज्याघडामोडी

आता समोर कोणताच मार्ग दिसत नाही”; व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

भिवंडी : व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून एका तरुणाने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीमध्ये घडली असून मयूर रामा जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलाजवळ सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. नदीपात्रात शोध सुरु आहे. मयूर हा कल्याण पश्चिम परिसरातील बारावे या गावात कुटुंबासह राहत होता. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आमचीच दुकाने दिसतात काय ,गावातील दारू धंदे दिसत नाहीत का ? म्हणत घातला पोलिसांशी वाद 

जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अंमल सुरु असून केवळ मेडिकल दुकानाशिवाय इतर कुठल्याही आस्थापना ८ ते १५ मे या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.या आदेशाची अमंलबजावणी करण्याच्या हेतूने पंढरपूर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी पोलीस आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करताना दिसून येत आहेत.पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्याचे […]

ताज्याघडामोडी

देश पुन्हा हादरला! ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने 22 हून अधिक रुग्णांचा तडफडून मृत्यू

आंध्रप्रदेश, 10 मे : आंध्रप्रदेशातील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद  झाल्याने तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानेही ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदात वर्तविण्यात […]

ताज्याघडामोडी

खरचं लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का? यावर केंद्र सरकारनेच दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरशः थैमान घातलेले आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे अनेकांमध्ये जाणवू लागली आहे. दरम्यान या कोरोनाविरोधातील लढाईत आता लसीकरण मोहिमेने वेग धरला आहे. आत्तापर्यंत देशातील १३ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु या लसीकरणानंतरही काहींना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खरच लसीकरणानंतर कोरोनाची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही’

वर्धा | राज्यात कोरोनाच्या संकटामुळे चिंताजनकपरिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, संपूर्ण आरोग्य यंत्रणा रोज नव्या समस्यांना सामोरे जात आहे. अशातही आरोग्य विभागातील लोकांना नातेवाईकांकडूनही हल्ले आणि असभ्य वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र, वर्ध्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना […]

ताज्याघडामोडी

रुग्णालयाला कोरोनाने ग्रासलं; 80 जणांना संसर्ग, 27 वर्षे सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरचा मृत्यू

नवी दिल्ली, 10 मे : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि बाकी मेडिकल स्‍टॉफला संसर्ग होण्याच्या आणि अनेकांचा जीव गेल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. देशातील अनेक भागातून फ्रंट लाइन वर्कर्सच्या मृत्यूची बातमी येत असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर ही स्थिती अधिक बिघडली आहे. अनेक रुग्णालयात तर स्टाफचे अनेक सदस्य एकत्रितपणे पॉझिटिव्ह आले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ; माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे, 10 मे: विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पुण्यातील माजी आमदार बाळासाहेब उर्फ चंद्रकांत शिवरकर आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यासह चौघांविरुद्ध कौटुंबीक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवरकर यांची सून 37 वर्षीय स्नेहा अभिजित शिवरकर यांनी वानवडी पोलिसांत फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी 38 […]