गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा गळा आवळून खून

प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने मयताच्या पत्नीच्या मदतीने प्रियकराने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अमरावती जिल्ह्यातील ही घटना असून अण्णा उत्तम जाधव (35, रा.बाजारसावंगी, ता. रत्नपूर) यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील गारज शिवारात लोकविकास शुगर मिल्सच्या जागेवर सोमवारी आढळला होता. अण्णाचा खून झाल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने […]

ताज्याघडामोडी

लसीचे दोन्ही डोस घेवूनही एकाच पोलिस ठाण्यातील 8 कर्मचारी बाधित

जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये आठ पोलीस कोरोनाबधित आढळून आलेले आहेत. या पोलिसांनी कोरोनाची दोन्ही लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस रस्त्यांवर आहेत, मात्र या पोलिसांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. एकाच पोलीस स्टेशन मधील आठ पोलीस कोरोनाबधित झाल्याने पोलीस दलात खळबळ उडवणारी ही बातमी आहे. कोरोना पाॅझिटीव्ह आलेले कर्मचारी यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट कागदपत्रांचा वापर करून जप्त केलेल्या कारची विक्री, आरटीओ अधिकाऱ्यांसह 12 जणांविरोधात गुन्हा

कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेल्या कारची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन आरटीओ अधिकाऱ्यांसह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खोटी तक्रार देऊन एपीएमसी पोलिसांचीदेखील फसवणूक करण्यात आली आहे. वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत […]

ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकं आंदोलन करणार आहेत, असं समजताच पोलिसांनी गोविंद बागेबाहेर सुरक्षा वाढवली आहे. दोन आंदोलकांना बारामतीत पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला […]

ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णाच्या उपचाराचे १० लाख रुपये मेडिक्लेम जमा तरीही दीड लाख डिपॉझिट परत देण्यास नकार 

 कोरोनाच्या या संकट काळात रुग्ण आणि रुग्णांची लूट सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. या रुग्णालांना कधी चाप बसणार आणि सर्वसामान्यांची लूट कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालयाने डिपॉझिट म्हणून घेतलेले पैसे परत करण्याचे नावच घेत नसल्याने त्यांच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्यात आलं. अर्धनग्न आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ट्रॅक्टर, वाहने चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश

पुणे, 25 मे : पुणे ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांसह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमधूनही त्यांनी ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची चोरी केली होती. त्यांच्याकडून 10 ट्रॅक्टरसह 14 चारचाकी, 6 बाईक, गाई आणि चोरीसाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यांनी केलेल्या 21 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला […]

ताज्याघडामोडी

समाजाचे शिल्पकार असणाऱ्या शिक्षकांनी दातृत्वाचा आदर्श निर्माण केला – आ. समाधान आवताडे

समाजाचे शिल्पकार असणाऱ्या शिक्षकांनी दातृत्वाचा आदर्श निर्माण केला – आ. समाधान आवताडे .. मंगळवेढा तालुक्यातील सर्व शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आज कोरोना महामारीच्या परिस्थितीला तोंड देत असताना आपल्या अध्यापनीय कौशल्याने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करून विद्येचा दिप तेवत ठेवणाऱ्या व समाज जडण – घडणीचे शिल्पकार असलेल्या तालुक्यातील शिक्षक बंधु – भगिनींनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोलापुरात कोरोना बाधित पोलिसाच्या पत्नीवर पोलीस कर्मचाऱ्याचा बलात्कार 

एकीकडे राज्यात पोलीस कर्मचारी भर उन्हात बारा बारा तास जनतेचा कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडत असतानाच व राज्यात कर्तव्य पार पाडताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलेला असताना दुसरीकडे याच पोलीस खात्यात काही राक्षसी प्रवृत्ती या खात्याची प्रतिमा मलीन करताना दिसून येत आहेत.कोविड सेंटर मध्ये उपचार घेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अखेर वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे बडतर्फ

एपीआय सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्यानंतर त्यांचा साथीदार कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला सोमवारी मुंबई पोलीस सेवेतून डच्चू मिळाला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केल्यानंतर सध्या तुरुगांत असलेल्या विनायक शिंदे याला सोमवारी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. वादग्रस्त कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला यापूर्वी लखनभय्या हत्येप्रकरणात अटक झाली होती. त्या प्रकरणात शिक्षा लागल्यानंतर तो कारागृहात […]

ताज्याघडामोडी

राज्यात 4 टप्प्यांमध्ये उठवला जाऊ शकतो Lockdown, ‘या’ पध्दतीची आहे ठाकरे सरकारची योजना, जाणून घ्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांची परिस्थिती बिकट करून सोडली आहे. म्हणून रुग्णाची वाढती संख्या पाहता राज्य शासनाने महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावला. १ जूननंतर लॉकडाऊन उठणार का अशा चर्चा लोकांमध्ये सुरु आहेत. मात्र सध्या रुग्णाची संख्या घटत असल्याने राज्य सरकारकडून लॉकडाउन शिथिल करण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी संकेत दिले आहे. मुख्यतः राज्य सरकार राज्यातील […]