उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरश: गुप्ता यांचा पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण केली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. […]
ताज्याघडामोडी
शेतकरी पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या -कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना
शेतकरी पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या -कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना पंढरपूर दि. (25):- जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत योग्य पद्धतीने कार्यवाही करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मौजे अजनाळे तालुका सांगोला […]
10 मिनिटात दीड लिटर कोल्ड ड्रिंक प्यायला; सहा तासात मृत्यू
कोल्ड ड्रिंक आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेकदा सांगण्यात येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण कोल्ड ड्रिंक घेतात. मात्र, अतिप्रमाणात कोल्ड ड्रिंक घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वाढत्या उष्णतेने त्रस्त झालेल्या एका 22 वर्षांच्या तरुणाने 10 मिनिटात तब्बल दीड लिटर कोल्ड ड्रिंक घेतले. त्यानंतर सहा तासातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. ‘डेली मेल’ने […]
दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या
दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या करून इसमाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आली आहे. सिरसाळा गावात मोहा रोड परिसरात रात्री साडेनऊ ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल […]
ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँक राहणार बंद
बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ […]
मंदिरे,प्रार्थनास्थळांना करावे लागणार या नियमांचे पालन
दुकानदार व्यवसायिक यांच्यासाठीही अनेक अटी लागू प्रार्थनास्थळे खुली केली जाणार असली, तरी त्यासाठी सरकारने नियमावली देखील घालून दिली आहे. त्यानुसार… १. ६५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरीक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. करोना नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचं संबंधित प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन कर्मचारी आणि भेट देणाऱ्या नागरिकांनी पालन करायचं आहे. २. शक्य […]
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिराची दारे उघडली जाणार
कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदिरं उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. येत्या 7 ऑक्टोबर रोजी म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मिळतेय. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री […]
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक धरणे ओसंडून वाहत आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मागील […]
सहकार उध्वस्त करू पाहणाऱ्याना धडा शिकवण्यासाठी मनसेला साथ द्या – मनसे नेते,दिलीप धोत्रे
महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रात एकेकाळी अव्वल दर्जाचा असताना आता मात्र संपायच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. सगळ्या राजकीय नेत्यांनी स्वतःची पोळी भाजून जनतेला मात्र कुपोषित करून सोडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सहकार सेना एक नवीन सहकार पर्व करून ते स्वच्छ करण्याचे काम नजीकच्या काळात करेल. असे प्रतिपादन मनसे नेते व सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी […]
सुधारीत ओबीसी अध्यादेशावर राज्यपालांची सही, राज्यपालांनी अध्यादेश राज्य सरकारकडे पाठवला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकांमध्ये मागासवर्गीय जागांचे (ओबीसी) एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही. तसेच ओबीसी प्रवर्गासाठी अधिकाधिक 27 टक्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याबाबत न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून सुधारित अध्यादेशाला संमती देण्यासाठी संबंधित अध्यादेशाचा प्रस्ताव पुनर्विचारासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे परत सादर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित […]










