ताज्याघडामोडी

सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री

देशात खाद्य तेल, पेट्रोल-डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यांच्या वाढत्या किमतीनं आधीच हैराण असलेल्या नागरिकांसाठी आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महागाईच्या या काळात नागरिकांना आता औषधांसाठीही अधिकचे पैसे मोजावे  लागणार असल्याची शक्यता आहे. नॅशनल फार्मस्यूटीकल प्राइसिंग ऑथिरीटीनं शुक्रवारी याबाबत माहिती देताना म्हटलं, की सरकरानं औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये […]

ताज्याघडामोडी

व्हॉट््सअ‍ॅपला रोखण्याची केंद्राची न्यायालयात मागणी

व्हॉट््सअ‍ॅपचे नवे व्यक्तिगतता धोरण आणि सेवाशर्तींच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध घालण्याची विनंती केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयास केली. नव्या धोरणाची अंमलबजावणी १५ मेपासून केली जाणार आहे. व्हॉट््सअ‍ॅप या समाज माध्यम व्यासपीठाच्या व्यक्तिगतता धोरणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही विनंती करण्यात आली आहे.

ताज्याघडामोडी

राज्यातील सर्व खासगी कार्यालयं, आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती;शासनाचे आदेश

मुंबई : कोविड रुग्णांचा महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढणारा आकडा पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. याच धर्तीवर नुकतेच राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ( आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) इतर ठिकाणी 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.सर्व […]

ताज्याघडामोडी

वीजबिल वसुली तर थांबवा वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी

वीजबिल वसुली तर थांबवा वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी थकित वीजबील वसुली करत महावितरणने वीज कनेक्शन तोडत आहेत व सरसकट वीज कपात करत आहेत यामुळे घरगुती तसेच शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. फळबागांसारख्या पिकांना दररोज पाण्याची गरज आहे. तसेच उभी पिके जळायला लागलेली आहेत याला […]

ताज्याघडामोडी

कोविड रुग्ण, ऐंशी वर्षावरील नागरिकांना टपालाव्दारे मतदानाची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

कोविड रुग्ण, ऐंशी वर्षावरील नागरिकांना टपालाव्दारे मतदानाची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती        पंढरपूर, दि. 19:- विधानसभेच्या पंढरपूर मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी  कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिकांना टपालाव्दारे मतदान करता येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे सांगितले. त्याचबरोबर मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते संध्याकाळी […]

ताज्याघडामोडी

देशभरातले टोलनाके हटवणार

येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद करण्यात येतील आणि टोलची रक्कम जीपीएस इमेजिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.गडकरी यांनी टोल नाके बंद करण्याचा आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या सरकारनी शहरांमध्ये अनेक ठिकाणी टोल नाके उभे करून पैसे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अजनसोंड येथील शेतकऱ्याच्या पीएचडी करत असलेल्या एकुलत्या एक मुलाचा महावितरणच्या गलथान कारभाराने घेतला जीव 

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता वाघमारे आणि काथवटे यांनी हलगर्जीपणामुळे पंढरपूर तालुक्यातील अजनसोड येथील शेतकरी उत्तम शंकर घाडगे वय 60 वर्ष यांच्या एकुलत्या एक मुलास विजेचा धक्का बसून आपला जीव गमवावा लागला आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी उत्तम शंकर घाडगे  यांनी पंढरपुरातील […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचे विद्यार्थी श्रीनाथ देशमुख हे सुवर्ण पदकाने सन्मानित

स्वेरीचे विद्यार्थी श्रीनाथ देशमुख हे सुवर्ण पदकाने सन्मानित   पंढरपूर- स्वेरी अभियांत्रिकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या श्रीनाथ जयवंत देशमुख यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘कै.श्रीमान भाऊसाहेब गांधी सुवर्णपदक ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.           पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातून […]

ताज्याघडामोडी

संत तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूत भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध 

राज्यात मागील बऱ्याच दिवसांपासून कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नियम पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. ज्या धर्तीवर परंपरागत चालत आलेल्या सोहळ्यांवरही कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव, आषाढी एकादशीच्या निमित्तानं निघणारी पायवारी यामागोमाग आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळ्यासाठी भाविकांना बंदी घालण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

25 लाखाच्या बदल्यात 50 लाख देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक

 25 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत 23 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. आरोपींनी 25 लाख घेऊन हातात कागदात गुंडाळून डुप्लिकेट बंडल देऊन फसवणूक केली आहे. प्रवीण प्रकाश (वय 30, काळेवाडी), मालेश सुरेश गावडे (वय 42) व व्यंकटरमण वसंतराव बाहेकर (वय […]