ताज्याघडामोडी

वीजबिल वसुली तर थांबवा वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी

वीजबिल वसुली तर थांबवा

वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी

थकित वीजबील वसुली करत महावितरणने वीज कनेक्शन तोडत आहेत व सरसकट वीज कपात करत आहेत यामुळे घरगुती तसेच शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. फळबागांसारख्या पिकांना दररोज पाण्याची गरज आहे. तसेच उभी पिके जळायला लागलेली आहेत याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत या पिकांचे पंचनामे करून मोबदला देण्यात यावा अशी मागणी रासपचे पंकज देवकते यांनी यावेळी केली.
आज दिनांक १९/मार्च/२०२१ रोजी राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब,प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात लेखी निवेदन देण्यात आली.
यावेळी ॲड.शरदचंद्र पांढरे साहेब,सांगली जिल्हा प्रभारी लक्ष्मण सरगर,उमाजी चव्हाण,महाळाप्पा खांडेकर सर,अनिल हेगडकर,उत्तम बाबा चव्हाण,जनहित संघटनेचे श्रीकांत नलवडे,विक्रम तरंगे,विनायक मेटकरी,पैगंबर शेख,सत्यजित गलांडे,कैलास गाढवे,आण्णा शेंडगे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *